सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:08 IST2021-08-12T04:08:34+5:302021-08-12T04:08:34+5:30

मुंबई : मुंबई, नवी मुंबई व सातारा येथे दुचाकीवरुन सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीच्या प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश ...

Gold chain thief arrested in Sarai | सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

मुंबई : मुंबई, नवी मुंबई व सातारा येथे दुचाकीवरुन सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीच्या प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश ऊर्फ छकुला देठे असे या सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोराचे नाव आहे. त्याच्या साथीदारासह नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषिकेश व त्याच्या साथीदारांवर मागील दहा वर्षांमध्ये सात गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीने मुंबई, नवी मुंबई व सातारा शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

६ जुलै रोजी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातून एक ज्येष्ठ महिला लस घेऊन घरी जात असताना ऋषिकेश व त्याच्या साथीदाराने दुचाकीवर पाठलाग करीत त्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. गोवंडी पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर सहायक पोलीस आयुक्त चेंबूर यांच्याकडे याचा तपास सोपविला असता, त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत या आरोपींना अटक केली. या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, या टोळीतील १४ आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

Web Title: Gold chain thief arrested in Sarai