हंगामी खरेदीच्या बळावर सोन्या-चांदीचे भाव तेजीत
By Admin | Updated: January 24, 2015 01:23 IST2015-01-24T01:23:45+5:302015-01-24T01:23:45+5:30
हंगामी खरेदीच्या बळावर सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी पुन्हा तेजी आली. दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे सोने १५0 ने वाढून २८,५00 रुपये तोळा झाले.

हंगामी खरेदीच्या बळावर सोन्या-चांदीचे भाव तेजीत
नवी दिल्ली : हंगामी खरेदीच्या बळावर सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी पुन्हा तेजी आली. दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे सोने १५0 ने वाढून २८,५00 रुपये तोळा झाले. चांदीच्या भावात ४00 ने वाढून ४0,१00 रुपये किलो झाला.
औद्योगिक क्षेत्राकडून असलेल्या चांदीच्या मागणीत वाढ झाली. शिक्के बनविणाऱ्यांकडून उत्तम मागणी राहिली. याचा लाभ चांदीला मिळाला. सोन्याला प्रामुख्याने लग्नसराईच्या खरेदीचा लाभ झाला. या शिवाय जागतिक पातळीवरही तेजीचेच वातावरण दिसून आले. युरोपियन केंद्रीय बँकेने मोठे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केल्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीत वाढ झाली. जागतिक तेजीचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारांवरही झाला. दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,५00 रु. व २८,३00 रु. तोळा झाला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ४00 रुपयांनी वाढून ४0,१00 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजाराने वाढून खरेदीसाठी ६५ हजार आणि विक्रीसाठी ६६ हजार रुपये प्रति शेकडा झाला. (प्रतिनिधी)
च्न्यूयॉर्क येथील बाजारात सोन्याचा भाव 0.७१ टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस १,३0२.१0 डॉलर झाला. चांदीचा भाव १.१0 टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस १८.३१ डॉलर झाला.