गणेशोत्सवात सोने-चांदी महाग

By Admin | Updated: August 30, 2014 03:48 IST2014-08-30T03:42:11+5:302014-08-30T03:48:26+5:30

दिल्लीच्या सराफ्यातही सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी ७० रुपयांनी वधारून २८,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सणासुदीच्या खरेदीने सराफा बाजारात तेजी दिसून आली.

Gold and silver in Ganeshotsav | गणेशोत्सवात सोने-चांदी महाग

गणेशोत्सवात सोने-चांदी महाग

नवी दिल्ली : गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे भाव वधारले आहेत. जागतिक बाजारातील तेजीने राजधानी दिल्लीच्या सराफ्यातही सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी ७० रुपयांनी वधारून २८,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सणासुदीच्या खरेदीने सराफा बाजारात तेजी दिसून आली.
दुसरीकडे चांदीचा भावही औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीने १५० रुपयांनी वाढून ४३,००० रुपये प्रतिकिलो झाला. बाजारातील जाणकारांनी सांगितले की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी सराफा बाजाराला पसंदी दिली. यामुळे जागतिक बाजारात तेजी नोंदली गेली. देशी बाजार धारणेवर याचा सकारात्मक परिणाम झाला. किरकोळ व्यापाऱ्यांनी सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव वधारून १,२९०.२२ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही ०.३ टक्क्यांनी वाढून १९.५७ डॉलर प्रतिऔंस राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold and silver in Ganeshotsav