सोन-चांदी उतरले
By Admin | Updated: December 9, 2014 03:11 IST2014-12-09T03:11:30+5:302014-12-09T03:11:30+5:30
जागतिक बाजारपेठेतील अनुत्साह आणि दागिने निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्यामुळे सोमवारी येथील बाजारपेठेत सोन्याचा भाव 25 रुपयांनी खाली येऊन 26,65क् रुपये झाला.

सोन-चांदी उतरले
>नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील अनुत्साह आणि दागिने निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्यामुळे सोमवारी येथील बाजारपेठेत सोन्याचा भाव 25 रुपयांनी खाली येऊन 26,65क् रुपये झाला.
औद्योगिक क्षेत्र आणि नाणो निर्मात्यांकडून मागणी कमी असल्यामुळे चांदी किलोमागे 5क् रुपयांनी खाली येऊन 36,65क् रुपयांवर स्थिरावली.
सिंगापूरला सोन्याचे भाव क्.4 टक्क्यांनी घटून 1187.27 डॉलर तर चांदी क्.8 टक्क्यांनी कमी होऊन 16.15 डॉलर प्रति औंस झाली. सिंगापुरातील सोन्याच्या भावाचा परिणाम भारतातील सोन्याच्या भावावर होत असतो. तेच आजही घडले. बाजारात घसरण पाहायला मिळाली.
गिन्नीचा भाव आधीचाच 23,7क्क् रुपये (प्रति 8 ग्रॅम) राहिला. दिल्लीत 99.9 आणि 99.5 शुद्ध सोन्याचा भाव 25 रुपये खाली येऊन 1क् ग्रॅमसाठी अनुक्रमे 26,65क् व 26,45क् रुपये झाला.
तयार चांदीचा भाव 5क् रुपयांनी घटून 36,65क् आणि चांदीच्या साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 75 रुपयांनी कमी होऊन 36,625 रुपये किलो झाला. मर्यादित व्यवहारांमुळे चांदीच्या नाण्यांचा भाव आधीच्याच 62,क्क्क् व 63,क्क्क् रुपये प्रति शेकडा भावावर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)