गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

By जयंत होवाळ | Published: June 5, 2024 08:20 PM2024-06-05T20:20:17+5:302024-06-05T20:20:27+5:30

या कामाची आज गगराणी यांनी अंधेरी येथे पाहणी केली.

Gokhale bridge and c. D. Barfiwala flyover connection work in final stage | गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया गोपाळकृष्ण गोखले पुलाची उंची  सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित कामे जलदगतीने करुन पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले.  महानगरपालिकेकडून  व्हिजेटीआय तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाची आज गगराणी यांनी अंधेरी येथे पाहणी केली.

या पाहणी दौऱयाच्या प्रारंभी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत गगराणी यांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन), सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यानाला (एरोप्लेन गार्डन) भेट दिली. सांताक्रुझ येथील बाल उद्यानात त्यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले.    कमला नेहरू  उद्यानात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी माहिती घेतली.  उद्यानात दररोज स्वच्छता करा, वाढलेल्या गवताची कापणी करा, उद्यानात साचणाऱया कचऱयाची रोज  विल्हेवाट लावा, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षा रक्षक नेमा, आदी सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या. 0कूपर रुग्णालयात रुग्णांची केली विचारपूस गगराणी यांनी कूपर हॉस्पिटल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाला देखील  भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करीत येथील कामकाजाचाही आढावा घेतला.

अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सुविधांविषयी माहिती दिली.  0के पूर्व विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राला भेट के पूर्व विभागातील नागरी सुविधा केंद्रालाही त्यांनी भेट दिली. जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची प्रणाली, विविध कर संकलनाचे कामकाज कसे सुरू आहे, याविषयी थेट कर्मचाऱयांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांचेही कौतुक केले.

Web Title: Gokhale bridge and c. D. Barfiwala flyover connection work in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई