Join us

रुग्णालयात जाण्यापूर्वी शरद पवारांनी घेतला रेमडीसीवीर अन् ऑक्सिजनचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:08 IST

शरद पवार हे पुढील 4 ते 5 दिवसांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शन संदर्भातील माहिती मी शरद पवार यांना दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात उत्पादिक होणारा 1250 मे. टन आणि इतर राज्यातून येणारा मिळून एकूण 150 मे.टन ऑक्सिजन सध्या उपलब्ध आहे. ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. तेव्हापासून ते घरीच आराम घेत आहेत. मात्र, घरातूनच राज्यातील कोरोना परिस्थितीवरही ते लक्ष ठेऊन आहेत. त्यासाठी, सातत्याने केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्याही संपर्कात आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडिसीवीर इंजेक्सनसंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून माहिती घेतली.  

शरद पवार हे पुढील 4 ते 5 दिवसांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शन संदर्भातील माहिती मी शरद पवार यांना दिली. देशातील इतरही राज्यात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, सर्वच ठिकाणी इंजेक्शनची गरज आहे. तरीही, राज्य सरकारला कमीटमेंट दिल्याप्रमाणे संबंधित कंपन्या व तेथील अधिकाऱ्यांनी, महाराष्ट्राला दररोज 70 हजार इंजेक्शन देणार असल्याचं म्हटलंय.

महाराष्ट्रात उत्पादिक होणारा 1250 मे. टन आणि इतर राज्यातून येणारा मिळून एकूण 150 मे.टन ऑक्सिजन सध्या उपलब्ध आहे. ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. केंद्र सरकारनेही ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात आश्वास दिलंय, असेही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. लसीच्या संदर्भातही शरद पवार यांच्याशी आपली चर्चा झाल्याचेही शिंगणे म्हणाले. 

रेमडिसीवीरसाठी प्रयत्न सुरू

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, रेमडेसिवीरचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात राज्यात जाणवतो ही वस्तूस्थिती आहे. पण २१ तारखेनंतर रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतची सूचना पाळली जात नाही. दुर्देवाने खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणं असली तरी रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही त्याची मागणी होते. काही रेमडेसिवीर कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू असं सांगितलं आहे. जास्तीत जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा व्हायला हवा यासाठी प्रयत्न सुरु आहे असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :शरद पवारमंत्रीकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस