मुंबई : मुंबईतील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातींच्या माशांचा वावर असतो. गणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्यांचा दंश होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून, मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात पालिकेने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा केली होती. त्यानुसार, या विभागाने विसर्जनादरम्यान या माशांकडून दंश होऊ शकतो. त्यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती पालिकेला केली आहे.
मुंबईतील किनारपट्टी ही संरक्षित किनारपट्टी असून, येथे वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत 'ब्ल्यू बटन जेली' सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये 'स्टिंग रे' (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.गेल्या वर्षी विसर्जनावेळी या माशांच्या दंशामुळे भाविकांना त्रास झाला होता.
मत्स्यदंशावर प्रथमोपचारमस्त्यदेशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्वाकीव कल तसेच १०८ रुग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.स्टिंग रे'ने दंश केलेल्या आगी २ आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.'स्टिंग रे' किंवा 'जेली फिश्चा देश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.जेलीफिशचा दंश झालेले ४ स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खचरदारी घ्यावी.मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ ५ पाण्याने धुऊन काढावी. जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.