Join us
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या गुजरातमधील गोदरेज गार्डन सिटी (सेलेस्ट) या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पात ११० कोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या गुजरातमधील गोदरेज गार्डन सिटी (सेलेस्ट) या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पात ११० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गोदरेज कंपनीच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिस ठाण्यात अहमदाबादच्या सिद्धी इन्फ्राबिल्ड प्रा.लि. आणि सिद्धी इन्फ्राबिल्डकॉन एलएलपी कंपनीसह त्यांच्या प्रमुखांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे. 

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल)चे वरिष्ठ महाव्यवस्थापक निसर्ग विनय पंड्या यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. २००७ मध्ये, गुजरात एकात्मिक टाउनशिप धोरणाअंतर्गत अहमदाबाद येथे प्रकल्प करण्याकरिता जीपीएल कंपनीची आणि अहमदाबाद येथील सिद्धी ग्रुपचे मुकेशकुमार केशवलाल पटेल आणि कल्पेशकुमार आत्माराम पटेल यांच्याशी चर्चा झाली. सिद्धी ग्रुपसोबत जीपीएल कंपनीने फेज १ मध्ये ७१ इमारतींचे बांधकाम पूर्ण (पान ८ वर)गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक करून ग्राहकांना सदनिकांचा ताबा वेळेवर दिला. 

पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ईडन जी अँड एच, ग्रीन ग्लेड्स, वनंता, वनांगन आणि सेलेस्ट हे पाच प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये महसुली वाट्याबाबत सिद्धी ग्रुपला ८४.४० टक्के, तर गोदरेज प्रॉपर्टीजला १५.६० टक्के वाटा निश्चित करण्यात आला होता.

जून २०२३ मध्ये सेलेस्ट प्रकल्पाच्या बांधकामात गंभीर संरचनात्मक आणि गुणवत्तेशी संबंधित दोष आढळले. आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याऐवजी सिद्धी ग्रुपने निधीअभावी असमर्थता दर्शवली आणि गोदरेज प्रॉपर्टीजकडे कर्जाची मागणी केली. त्यानुसार, गोदरेज प्रॉपर्टीजने ऑगस्ट २०२३ पासून आतापर्यंत ५७.३० कोटींचे कर्ज १२ टक्के व्याजदराने दिले. मात्र, या कर्जानंतरही प्रकल्पात प्रगती न झाल्याने सप्टेंबर २०२३ मध्ये बांधकाम थांबवण्यात आले आणि अखेर नोव्हेंबर २०२४ मध्ये गोदरेजच्या गुणवत्ता मानकांनुसार प्रकल्पाची पुनर्बांधणी करण्यासाठी बांधकाम पाडण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास एकूण २२१.७२ कोटी रुपयांपैकी ११० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप मुकेश पटेल, कल्पेशकुमार पटेल, जास्मीन मुकेश पटेल, तसेच सिद्धी इन्फ्राबिल्ड प्रा. लि. आणि सिद्धी इन्फ्राबिल्डकॉन एलएलपी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.

पैसे वळवले कंपन्यांच्या खात्यात गोदरेज ब्रँडच्या नावाखाली सदनिका विक्री केल्या जात असल्या तरी, ग्राहकांकडून आलेली सर्व रक्कम सिद्धी इन्फ्राबिल्डकॉन एलएलपीच्या नियंत्रणातील रेरा बँक खात्यांमध्ये जमा होत होती. त्यानंतर त्यातील मोठा हिस्सा संबंधित भागीदार आणि त्यांच्या संलग्न कंपन्यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Godrej defrauded of ₹110 crore in housing project; FIR filed.

Web Summary : Godrej Properties alleges ₹110 crore fraud in its Ahmedabad housing project. Siddhi Group faces charges of misappropriating funds meant for the 'Godrej Garden City' project and diverting them to other accounts, leading to construction halt and quality issues. Economic Offences Wing is investigating.
टॅग्स :धोकेबाजी