शिळकरांची पिढी घडवितेय टेंभीनाक्याची देवी

By Admin | Updated: September 15, 2014 23:07 IST2014-09-15T23:07:36+5:302014-09-15T23:07:36+5:30

स्थापनेपासून अर्थात गेली 35 वर्षे टेंभी नाक्याच्या देवीची मूर्ती घडविणारे मूर्तीकार पुंडलिक शिळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात यंदा त्यांची दुसरी पिढी ही आदिशक्ती घडविण्यात मगA झाली आहे.

The Goddess of Tambanakas is raising the generation of stalkers | शिळकरांची पिढी घडवितेय टेंभीनाक्याची देवी

शिळकरांची पिढी घडवितेय टेंभीनाक्याची देवी

स्नेहा पावसकर - ठाणो
स्थापनेपासून अर्थात गेली 35 वर्षे टेंभी नाक्याच्या देवीची मूर्ती घडविणारे मूर्तीकार पुंडलिक शिळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात यंदा त्यांची दुसरी पिढी ही आदिशक्ती घडविण्यात मगA झाली आहे. त्यांचे बंधू किरण ,मुले दीपक आणि विनोद यांनी 4 सप्टेंबरला मुहूर्तावर मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले असून उर्वरित रेखीव काम,रंगकामही लवकरच पूर्ण होणार आहे.
        लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली टेंभीनाक्याची देवी आणि कळव्याचे मूर्तीकार पुंडलिक शिळकर म्हणजे एक समीकरणच तयार झाले होते. देवीचे रूप,तिच्या चेह:यावर विलक्षण तेज आणि डोळ्यांमध्ये सजीवपणा साकारणो ही किमया शिळकरांकडे होती. परंतु यंदा मार्च महिन्यात पुंडलिक शिळकरांच्या झालेल्या निधनानंतर यंदा देवी कोण साकारणार? दरवर्षीप्रमाणो मूर्तीचे रूप हुबेहुबच राहणार का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाले होते. मात्र शिळकरांच्या पश्चात त्यांचे बंधू आणि दोन्ही मुलांनी देवीची हुबेहुब मूर्ती साकारण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. सुमारे 25 वर्षे जास्त शिळकरांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे बंधू किरण यांनी यावर्षी मूर्ती घडविली आहे. विशेष म्हणजे मूर्ती घडविण्याला सुरूवात करण्यापासून ते डोळयांची आखणी, रंगकाम या सगळ्यासाठी स्वतंत्र्य मुहूर्त काढला जातो. मुहूर्तावर पूजा झाली की मग त्या-त्या कामांना सुरूवात होते. यंदा 4 सप्टेंबरच्या मुहूर्तावर मूर्ती घडविण्यास सुरूवात झाली. अगदी आठ दिवसात संपूर्ण मूर्ती साकरून पूर्ण झाली आहे. ही साडे सात फूटी मूर्ती संपूर्ण शाडूच्या मातीपासून तयार केली जात असून चेहरा आणि हात वगळता उर्वरित मूर्ती हाताने घडविली जाते. पुंडलिक शिळकर यांचा त्यात हातखंडा होता. यंदा किरण यांनी मूर्ती घडविली असून गेल्या 1क् वर्षानुसार यंदाही डोळ्यांची आखणी तेच करणार आहेत. तर अखेरच्या दिवशी देवीला दागिने घालण्याचे कामही आपण करणार असल्याचे किरण यांनी सांगितले. उर्वरित रंग आणि फिनिशिंगचे काम दीपक आणि विनोद करणार आहेत. 
 
आनंद दिघेंच्या पसंतीने  तोच चेहरा कायम..
ज्यावर्षी घटांऐवजी देवीच्या मूर्तीच्या  स्थापनेला सुरूवात झाली त्यावर्षी स्वर्गीय आनंद दिघे यांनी स्वत: शिळकर यांची भेट घेवून साधारण गुजराथी पेहराव असलेली मूर्ती घडविण्यास सांगितली होती. त्यानंतर शिळकर यांनी घडविलेली मूर्ती पाहून दिघे यांनी तिला पसंती देऊन देवीचा तोच चेहरा कायमस्वरूपी ठेवण्याचे सांगितले. त्यानुसार शिळकर यांनी तात्काळ चेहरा काढून त्याचा साचा तयार केला आणि जणू तो पॅटर्नच बनला.

 

Web Title: The Goddess of Tambanakas is raising the generation of stalkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.