इंदिरानगरमध्ये गोदामाला भीषण आग

By Admin | Updated: September 5, 2015 23:15 IST2015-09-05T23:15:57+5:302015-09-05T23:15:57+5:30

एमआयडीसीतील इंदिरानगर झोपडपट्टीमधील गोदामाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. आगीमध्ये लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. सहा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

The goddamage fire in Indiranagar | इंदिरानगरमध्ये गोदामाला भीषण आग

इंदिरानगरमध्ये गोदामाला भीषण आग

नवी मुंबई : एमआयडीसीतील इंदिरानगर झोपडपट्टीमधील गोदामाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. आगीमध्ये लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. सहा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाचे जवान व परिसरातील कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
तुर्भे - महापे रोडवर असणाऱ्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये रद्दीच्या गोडावूनमध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. गोडावूनमध्ये मोठ्याप्रमाणात रद्दी असल्यामुळे काही क्षणात पुर्ण गोडावूनमध्ये आग पसरली. दुसऱ्या मजल्यावर सहा कर्मचारी आतमध्ये अडकले होते. आगीतून सुटका करून घेण्यासाठी कामगारांनी पहिल्या मजल्यावरून उडी टाकली. यामधील तीन जण जखमी झाले आहेत. गोडावूनच्या बाहेर असलेल्या दोन टेंपोनाही आग लागली. एमआयडीसी व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जावून आग विझविण्यास सुरवात केली. आग बाजूच्या झोपड्यांना लागणार नाही यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. अचानक लागलेल्या आगीमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नगरसेवक सुरेश कुलकर्णी, जनार्दन सुतार, शिवसेनेचे महेश कोठीवाले, संतोश नेटके, सौदागर वाघमारे यांनी आगीच्या ठिकाणी जावून नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले. कोटीवाले यांनी गोडावूनच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना गॅसचे सिलेंडर बाहेर आण्याचे आवाहन केले. जवळपास ५० घरातील गॅस सिलेंडर रोडवर सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आले.
आग मोठी असल्यामुळे महावितरणने तत्काळ परिसरातील विद्यूत पुरवठा बंद केला. औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्यूतवाहिनीवरील विजपुरवठा बंद करण्यात आला.

पालिकेच्या शिक्षकाचा असाही शिक्षक दिन
शुक्रवारी रात्री गोडाऊनला आग लागल्यानंतर महापालिकेच्या शाळा क्रमांक २६ मध्ये शिक्षकाची नोकरी करणाऱ्या सिद्धाराम शीलवंत यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग पसरली तर रहिवाशांना व शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी मित्र व परिसरातील कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले. दिवसभर परिसरात फिरून विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी
केली.

Web Title: The goddamage fire in Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.