ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST2021-02-06T04:09:17+5:302021-02-06T04:09:17+5:30

कोविड-१९ चा आणि क्लायमेंट चेंजचा संबंध आहे का? हा प्रश्न आहेच. त्याचे उत्तर तसा सरळसरळ संबंध नाही पण कोविड-१९च्या ...

Global warming climate change | ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज

ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज

कोविड-१९ चा आणि क्लायमेंट चेंजचा संबंध आहे का? हा प्रश्न आहेच. त्याचे उत्तर तसा सरळसरळ संबंध नाही पण कोविड-१९च्या प्रसारासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या क्लायमेंट चेंज जबाबदार आहे. ज्यावेळी जगभर लाॅकडाऊन झाले तेव्हा ‘एअर पोल्युशन क्वालिटी’ सुधारली, असे आपल्याला दिसते. कारण वाहतुकीवर लाॅकडाऊनचा परिणाम झाला, इंडस्ट्री बंद होत्या. जागतिक कार्बन उत्सर्जन हे एप्रिल महिन्यात १७ % वर पोहोचले होते. मात्र, मे महिन्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ते ४७१.१वर पोहचले म्हणजेच (471.1 part's per million)

याचे कारण शास्त्रीयदृष्ट्या असे आहे की, माणसाकडून उत्सर्जित झालेला कार्बनडायोक्साईड हा वातावरणात १०० वर्षे टिकू शकतो. कारण अनलाॅक प्रक्रियेमुळे लगेच व्यापावृध्दीच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात जास्त म्हणजे विमान सेवेच्या गतिशीलतेने पुन्हा एकदा कार्बन उत्सर्जन वाढलेले दिसते. कोविडच्या उद्रेकामुळे माणसाचे Behavior सामाजिक दृष्टिकोन, राज्यकर्त्यांचा याविषयीचा प्रतिसाद यामुळे पॅरिस ॲग्रीमेंटच्या बाबी साहजिकच थोड्या मागे पडल्या. काही देश जे कार्बन उत्सर्जनाचे आणि ते कमी ठेवण्याचे प्लान्स करणार होते ते मागे पडले. ग्लोबल तापमानावर अंकुश ठेवण्यासाठी काही निर्बंधावर ही अर्थकारणाची गाडी रूळावर आणण्यासाठी विविध देशांनी शिथिलता आणली. बायोडायव्हरसिटी वनस्पती व वन्य जीवन सुरक्षित राखण्यासाठी घेण्यात येणारी परिषद जी २०२०मध्ये होणार होती, ती आता २०२१पर्यंत पुढे ढकलली गेली. अशाप्रकारचे सर्व निर्णय कोविडच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलले गेले आणि स्वाभाविकपणे भौगोलिकदृष्ट्या हालचाल म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन बंद पडले होते. पण त्यांनी कोरोनाच्या संसर्गावर काही परिणाम झाला का? कारण ट्रान्सपोर्ट बंद म्हणजे वाहनांनी होणारे प्रदूषण कमी होणार, पण संसर्गाविषयी विशेष करून कोरोनाच्या संसर्गानंतर प्रदूषणात घट दिसली तरी नंतर क्लायमेट चेंजमध्ये फारसा फरक दिसला नाही. पण त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने मात्र २०३० ते २०५० या कालावधीत या क्लायमेट चेंजमुळे २,५०,००० अधिकचे मृत्यू प्रत्येक वर्षी जगात होऊ शकतात, यामध्ये विशेष करुन कुपोषण, मलेरिया हिटस्ट्रोक या कारणांचा समावेश असेल, असे भाकीत केले. २०१९ साली आपण क्लायमेट चेंजमुळे सर्व जगात चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस अशाप्रकारची संकटे पाहिली. लंग्जस फायब्रोसिस, ॲलर्जिक रिॲक्शन, मानसिक तणाव यासारख्या पोस्ट कोविड व्याधी बळावतील. उद्योग-धंदे सुरु झाल्याने प्रदूषण वाढेल क्लायमेंट चेंज आपले रंग दाखवेल. आतापर्यंतचे जागतिक पातळीवरील सर्व प्रयत्न यामुळे व्यर्थ ठरतील. उद्योग तसेच पर्यावरणपूरक उद्योग नव्याने सुरु करून कार्बन उत्सर्जनाचा समतोल राखणे हे आव्हान ठरेल, कारण उद्योग सुरु झाले तरच बेरोजगारी काही प्रमाणात हटेल आणि देशाची, जगाची आर्थिक घडी नीट बसवणे शक्य होईल. त्यामुळे पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये ठरवलेला रोड मॅप प्रत्यक्षात उतरण्यासाठी वॅक्सीनची पहिली फेरी संपतासंपता पुन्हा एकदा कंबर कसावी लागणे आवश्यक आहे.

कारण बदलते हवामान, टोकाची उष्णता ही हृदयविकार, श्वसनविकारांना आमंत्रण देते, त्यामुळे स्मॉग पोस्ट कोविड व्याधी and air borne allergens तयार होतात आणि अस्थमा विकार बळावतात. दुष्काळ, पाण्याचे दुर्भीक्ष्य हे malnutrition, water borne disease ना आमंत्रण देतात. समुद्राच्या लाटांची उंचावणारी पातळी लोकांचे स्थलांतर घडवते, संपत्तीचा नाश करते. त्याचबरोबर क्लायमेंट चेंज हे व्हायरस आणि मनुष्यप्राणी यांना जवळ आणण्याचे काम करतात. ३,२०,००० प्रकारचे व्हायरस जे मानवाला संसर्गित किंवा खऱ्या अर्थाने mammals ना संसर्गित करु शकतात. गेल्या शंभर वर्षांतील सर्व पॅम्डेमिक्स पाहिल्या तर त्या प्राण्याकडून विषाणू, जीवाणू माणसाकडे येऊन माणूस संसर्गित झालेला आहे. अनेक zonotic disease हे पुरामुळे मानवी आयुष्यात शिरलेले दिसतात, त्यामुळे प्राणी आणि मनुष्यप्राणी एकत्र येणे, कीटकांची वाढ होणे या सर्वांसाठी क्लायमेट चेंजचा विशेष करुन आशिया खंडातील राष्ट्रे तसेच आफ्रिका खंडातील राष्ट्रे यांना खूप मोठा फटका बसला आहे. तसा कोविड-१९ला क्लायमेट चेंजचा सरळ फटका बसला नाही. पण आपत्ती कालावधीत व पुनर्वसनाच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे खूपच कठीण गेले आणि संसर्गात वाढ झाली. दहा मोठ्या राष्ट्रांनी कोविडचे खूप मोठे भयंकर परिणाम आणि मनुष्यहानी अनुभवली. त्याचबरोबर कोविड-१९मुळे क्लायमेंट चेंज करण्याचे जे आव्हान राष्ट्रांनी स्वीकारले होते, त्यालाही तात्पुरती खीळ बसली. आज आपण जगाचा विचार केला तर IPOS सर्व्हेप्रमाणे कोरोना व्हायरस हा जगातील सर्वात भेडसावणारा घटक आहे. ६१ % कोरोना व्हायरस (कोविड-१९) ३५ % बेरोजगारी, २८ % आरोग्यसेवा, २७% गरिबी आणि सामाजिक असमानता आणि २२ % भ्रष्टाचार ह्या समस्या आज जगासमोर आहेत.

बेरोजगारी आणि ट्रेड यांचा खूप जवळचा संबंध आहे. कोविड-१९मुळे सर्व ‘ट्रेड-ऑफ’ झाल्याने बेरोजगारीत भर पडली. धंदे बंद झाल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले का? तर त्याचे उत्तर शोधताना असे दिसते की, ‘तात्पुरते’ कमी झाले. म्हणजेच सर्व परिस्थिती पूर्ववत झाली. कमी झालेले उत्सर्जन पुन्हा ‘बाऊन्स बॅक’ झाले, २००८चे उदाहरण आपल्यासमोर आहेच. जागतिक उत्सर्जनात झालेली घटही टिकली नाही, २०१०मध्ये मोठ्या प्रमाणावर पुन्हा उसळी मारून पूर्वीपेक्षा कार्बन उत्सर्जन जास्त झाले. म्हणजेच 9.1bn tonnes इतके झाले. कोविडनंतरही तसेच होईल याचबरोबर कोविडच्या संसर्गानंतर झालेले फुफ्फुसावरील जबाबदार आहे, त्यामुळे क्यासनुर फाॅरेस्ट डिसीज असो, scrub typhus, जपानीज Encephalitis डेंग्यू, मलेरिया, रिकेटशियल फिव्हर, प्लेग (सध्या नसला तरी), कोविड-१९, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यलो फिव्हर, झिका, चिगुनगुणिया, लेशमीनायसीस, हंटा व्हायरस, सॅण्ड फ्लाय फिव्हर, रिफ्ट व्हॅली फिव्हर (RVF), वेस्ट नाईल फिव्हर, congo फिव्हर असे अनेक आजार वातावरणाच्या बदलाशी संबंधित आहेत. म्हणूनच कोविड-१९सारखी महामारी पुन्हा येऊ नये, म्हणून ‘क्लायमेंट चेंज’ हाच प्रमुख अजेंडा प्रत्येक राष्ट्राच्या समोर हवा. पृथ्वीचे तापमान न वाढू देता पॅरिस ॲग्रीमेंटप्रमाणेच सर्व राष्ट्रांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून कार्बन उत्सर्जन कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखावा.

- डाॅ. दीपक सावंत

Web Title: Global warming climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.