लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर सोहळ्याची ‘ग्लोबल’ झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:59 AM2018-04-13T03:59:51+5:302018-04-13T03:59:51+5:30

‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असे ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानाने निमंत्रित केले होते.

'Global' leap for Lokmat Maharashtrian's The Art of the Year | लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर सोहळ्याची ‘ग्लोबल’ झेप

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर सोहळ्याची ‘ग्लोबल’ झेप

Next

मुंबई : ‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असे ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानाने निमंत्रित केले होते. या वर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या आॅनलाइन मतदानात महाराष्ट्राबाहेरच्या या सुहृुदांनीही आपला सहभाग नोंदवला होता.
उत्तर अमेरिकेतून एकूण पंधरा संस्था या वर्षीच्या सोहळ्याच्या ‘सहयोगी’ होत्या. त्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या मराठी मंडळांची मातृसंस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचा समावेश होता. शिवाय महाराष्ट्र मंडळ बे एरिया, सॅन डिआगो महाराष्ट्र मंडळ, मराठी मंडळ-लॉस एंजेलिस, सिआटल महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र मंडळ-नॉर्थ कॅरोलिना, मराठी मंडळ - सक्रमेंटो, शार्लट मराठी मंडळ, डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ, अल्बनी महाराष्ट्र मंडळ, ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ, बफेलो मराठी मित्र परिवार आणि जय भारत ढोल ताशा पथक यांचा समावेश होता.
कॅनडातील मराठी भाषिक मंडळ टोरोंटो हेही या सोहळ्याचे सहयोगी होते. युरोपीय देशांमधील मराठी संस्थाही यानिमित्ताने ‘लोकमत’च्या व्यासपीठावर आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ-म्युनिक(जर्मनी), महाराष्ट्र मंडळ-पॅरिस (फ्रान्स), इल्फर्ड मित्र मंडळ-लंडन, स्लाव्ह मित्र मंडळ- युके, महाराष्ट्र मंडळ - नेदरलॅण्डस, बेल्जियम मराठी मंडळ - ब्रसेल्स यांचा समावेश होता.
याशिवाय मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, तोक्यो मराठी मंडळ (जपान), महाराष्ट्र मंडळ - व्हिक्टोरिया (आॅस्टेÑलिया), महाराष्ट्र मंडळ- कुआलालम्पूर (मलेशिया) आणि चीनमधले शांघाई मराठी मंडळ यांनीही यंदाच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहळ्यासाठी आपला सहयोग दिला.
>लंडनचं महाराष्ट्र मंडळ ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन’
भारताबाहेर स्थापन झालेलं पहिलं मराठी मंडळ अशी ख्याती असलेल्या लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचा ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. १९५६पासून मंडळाचे सक्रिय सभासद असलेले लंडननिवासी
मुकुंद नवाथे यांनी हा सन्मान स्वीकारला.

Web Title: 'Global' leap for Lokmat Maharashtrian's The Art of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.