पीक विम्याचे पैसे आठ दिवसांत द्या

By Admin | Updated: May 17, 2015 01:59 IST2015-05-17T01:59:45+5:302015-05-17T01:59:45+5:30

मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

Give the money for the crop insurance in eight days | पीक विम्याचे पैसे आठ दिवसांत द्या

पीक विम्याचे पैसे आठ दिवसांत द्या

अन्यथा आंदोलनाचा धनंजय मुंडे यांचा इशारा
मुंबई : मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे त्रस्त झाला आहे. त्यांना जाहीर केलेली मदत अद्यापही मिळालेली नाही. खरिपांच्या पेरण्यांना १५ दिवसांत सुरुवात होईल. अशावेळी पेरणीसाठी मदत होणे आवश्यक आहे. सरकारने संकटसमयी शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाहीच; किमान आता मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम तरी आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याच्या दृष्टीने पावले उचला. जेणेकरून खरिपाच्या पेरणीसाठी मदत होऊ शकेल, असे ते म्हणाले.

Web Title: Give the money for the crop insurance in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.