Join us

दिशा मृत्यूसंबंधी याचिकेची प्रत राज्य सरकारला द्या!, उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:42 IST

Disha Salian Death Case: याचिकेची प्रत राज्य सरकारला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी दिले.

मुंबई : दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह  राजपूतची व्यवस्थापक दिशा सालीयन मृत्यूप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयने करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेची प्रत राज्य सरकारला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी दिले.अभिनेता सुशांतसिंह राजपूत व दिशा या दोघांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आणि या दोघांच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे, असे व्यवसायाने वकील असलेले व याचिकाकर्ते पुनीत धांडा यांनी याचिकेत म्हटले आहे. न्या. के. के. तातेड व न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती. पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी हाेईल. 

टॅग्स :न्यायालय