Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतही द्या सीएपीएफची कॉन्स्टेबल पदाची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:57 IST

Exam: गृह मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील (सीएपीएफ) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या भरतीसाठी मराठी आणि हिंदीसह १३ प्रादेशिक भाषांत परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. 

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील (सीएपीएफ) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या भरतीसाठी मराठी आणि हिंदीसह १३ प्रादेशिक भाषांत परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. स्थानिक तरुणांची संख्या वाढवण्यासाठी व प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सीएपीएफमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यांचा समावेश होतो.

टॅग्स :परीक्षा