नालासोपाऱ्यात तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: November 15, 2016 04:15 IST2016-11-15T04:15:48+5:302016-11-15T04:15:48+5:30

नालासोपाऱ्यातील एका वीस वर्षीय तरुणीने सोमवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली असून, तिने मोबाईलवर केलेल्या मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचे

The girl's suicide in the cavity | नालासोपाऱ्यात तरुणीची आत्महत्या

नालासोपाऱ्यात तरुणीची आत्महत्या

विरार : नालासोपाऱ्यातील एका वीस वर्षीय तरुणीने सोमवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली असून, तिने मोबाईलवर केलेल्या मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे.
जैन मंदिरासमोर राहणारी नूतन नाना शेवाळे (२०) पहाटे साडेचारच्या सुमारास आचके देऊ लागली. तिच्या वडीलांना जाग आली. नूतनच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी मुलगा ओमकार व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विषारी औषधामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हसतमुख आणि रात्री ११ वाजेपर्यंत सर्वांशी गप्पा मारून झोपायला गेलेल्या नूतनने विषप्राशन करून आत्महत्या केल्यामुळे तिचे पालक चक्रावून गेले आहेत. तिचा मोबाईल तपासण्यात आल्यावर त्यात तिने आपल्या आई वडीलांना उद्देशून एक मेसेज टाईप करून ठेवलेला आढळून आला. सॉरी आई पप्पा! माफ करा मला. मी हरले आयुष्याला, जगायची हिम्मतच नसावी एवढी निगेटीव्ह झाली आहे. फक्त एका कारणामुळे विशाल सरांमुळे. असा मेसेज तिने टाईप केल्याने तिच्या आत्महत्येचा उलगडा झाला. नूतन ही अंधेरी येथील एका कॉम्प्युटर क्लासेसमध्ये शिक्षण घेत होती. क्लासच्या सरांचे नाव विशाल असल्याचे तिच्या भावाने सांगितले. त्यामुळे नूतनच्या आत्महत्येचे गूढ वाढले असून तपास करतांना मेसेजमधील मजकुराचीही सत्यता पोलीस तपासून पाहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: The girl's suicide in the cavity