‘त्या’ मुलीच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन
By Admin | Updated: September 6, 2014 01:12 IST2014-09-06T01:12:00+5:302014-09-06T01:12:00+5:30
तुर्भेतील विनयभंग झालेल्या त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला.

‘त्या’ मुलीच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन
नवी मुंबई : तुर्भेतील विनयभंग झालेल्या त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मुलीबद्दल परिसरात सुरु असलेल्या उलटसुलट चर्चामुळे हृदयविकाराचा झटका येवून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
तुर्भे येथील 9 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली होती. लसूण आणण्यासाठी मुलगी दुकानात गेली असता दुकानातील तरुणाने तिच्यासोबत ईल चाळे केले होते. परंतु वेळीच या मुलीने तेथून पळ काढून घटलेल्या घटनेची माहिती घरच्यांना दिली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अजित गुप्ता (23) याला अटक केली. परंतु या घटनेनंतर सदर मुलीबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु होत्या. अटक आरोपी अजित याच्या कुटुंबीयांकडून या चर्चा पेरल्या जात असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणो होते. परंतु मुलीच्या बदनामीच्या या चर्चा काही केल्या थांबत नव्हत्या. त्यामुळे चिंतीत झालेल्या मुलीच्या वडिलाला हृदयविकाराचा झटका येवून त्यांचा मृत्यू झाला आहे. संतोष पवार (42) असे या मयत वडिलांचे नाव आहे. पवार हे पत्नी व तीन मुलींसह तुर्भे येथे रहायला होते. एमआयडीसीमधील कंपनीत ते मजूर म्हणून काम करायचे. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांचा आधार हरपलेला आहे. या घटनेने शुक्रवारी या परिसरात तणावाचे वातावरण होते. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही होत आहे. (प्रतिनिधी)