Join us  

भेटायला नकार दिला म्हणून तरुणीला धमकी, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 4:23 AM

एका हॉटेलमध्ये नेहा (नावात बदल) काम करते. त्याच दरम्यान हॉटेलमध्ये येणाऱ्या सोलंकीसोबत तिची ओळख झाली.

मुंबई : भेटायला नकार दिला म्हणून मैत्रिणीला शेरेबाजी करत तिच्या बहिणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार गुरुवारी चारकोपमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी आकाश सोलंकी (४२) याला अटक केली आहे.

एका हॉटेलमध्ये नेहा (नावात बदल) काम करते. त्याच दरम्यान हॉटेलमध्ये येणाऱ्या सोलंकीसोबत तिची ओळख झाली. त्याचे अनेकदा हॉटेलमध्ये येणे-जाणे असल्याने नेहा आणि सोलंकीमध्ये मैत्री झाली. गेल्या दोन महिन्यांपासून सोलंकी नेहाच्या इमारतीखाली येऊन अश्लील हावभाव करत असे. ‘तुझ्या बहिणीला माझ्यासोबत पाठव,’ असेही त्याने धमकावल्याची तक्रार नेहाने चारकोप पोलीस ठाण्यात केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप धावरे यांनी सांगितले.

टॅग्स :अटकपोलिसमुंबई