गोरेगावमध्ये मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: September 19, 2015 01:22 IST2015-09-19T01:22:48+5:302015-09-19T01:22:48+5:30
गोरेगाव पूर्व परिसरात एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली, ज्यात एक जण हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे

गोरेगावमध्ये मुलीचा विनयभंग
मुंबई : गोरेगाव पूर्व परिसरात एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली, ज्यात एक जण हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
संतोषनगर परिसरात ही पीडित मुलगी कुटुंबासोबत राहते. गुरुवारी दुपारी या परिसरात खेळत असताना अजगर अस्लम शेख (२०) आणि त्याचा साथीदार अली शेख (१९) यांनी तिला बळजबरीने एका झाडामागे नेऊन तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या या मुलीने घरी आल्यावर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी तिच्या वडिलांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार दिंडोशी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक अविनाश जाधव यांनी सराईत गुन्हेगारांचे फोटो मुलीला दाखविले. त्यात घरफोडीचा आरोपी असलेल्या अजगरला पीडित मुलीने ओळखले. त्यानुसार संतोषनगर परिसरातून त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. (प्रतिनिधी)