‘त्या’ तरुणीचाही अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST2021-02-09T04:08:44+5:302021-02-09T04:08:44+5:30

मुंबई : प्रेमभंगाच्या रागातून २४ वर्षांच्या तरुणीला तिच्या प्रियकराने जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात प्रियकराचा रविवारी मृत्यू झाला. दरम्यान, ...

The 'that' girl died too | ‘त्या’ तरुणीचाही अखेर मृत्यू

‘त्या’ तरुणीचाही अखेर मृत्यू

मुंबई : प्रेमभंगाच्या रागातून २४ वर्षांच्या तरुणीला तिच्या प्रियकराने जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात प्रियकराचा रविवारी मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी तरुणीनेही रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. याप्रकरणी मेघवाडी पोलीस चौकशी करत आहेत.

रविवारी विजय खांबे (३०) नामक व्यक्तीने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत खांबे हादेखील आगीत होरपळला ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर तरुणीला जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करत नंतर जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तरुणी ८०% भाजल्याने तिची स्थिती नाजूक होती. उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी तिची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याने तरुणीने खांबेशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. याच रागातून अखेर तिला जीव गमवावा लागला.

Web Title: The 'that' girl died too