‘कासारवडवली श्री’चा गिरीश शेट्टी मानकरी
By Admin | Updated: November 25, 2014 22:55 IST2014-11-25T22:55:09+5:302014-11-25T22:55:09+5:30
स्पध्रेत 5क् स्पर्धकांमधून तिस:या (टॉल) गटातील गिरीश शेट्टी (अपोलो जिम, ठाणो) याची पहिला ‘कासावडवली श्री’ म्हणून निवड करण्यात आली.

‘कासारवडवली श्री’चा गिरीश शेट्टी मानकरी
ठाणो : ‘अस्मिता’ वाचनालयाच्या महोत्सवांतर्गत कासारवडवली ग्रामस्थ मंडळ व जय हनुमान व्यायामशाळेच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणो जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने नुकतीच ठाणो जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिली होती. या स्पध्रेत 5क् स्पर्धकांमधून तिस:या (टॉल) गटातील गिरीश शेट्टी (अपोलो जिम, ठाणो) याची पहिला ‘कासावडवली श्री’ म्हणून निवड करण्यात आली. कासारवडवलीच्या आदर्श विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या या स्पध्रेत 24 गुणांसह कळव्याच्या अॅपोलो जिमने सांघिक अजिंक्यपद तर 12 गुणांसह ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने सांघिक उपविजेतेपद पटकाविले. रूपेश चव्हाणची (स्फूर्ती व्यायामशाळा, ठाणो) याची सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून निवड झाली. अस्मिता वाचनालयाचे अध्यक्ष किशोर भोईर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू जय पाटील, ठाणो जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष कमलाकर पाटील, ठामपा परिवहन सदस्य प्रकाश कदम, कासारवडवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश शिंगे, जय हनुमान व्यायामशाळेचे उपाध्यक्ष अविनाश राऊत, ठाण्याचे माजी उपमहापौर नरेश मणोरा आदींच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.