गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज
By Admin | Updated: September 5, 2015 02:07 IST2015-09-05T02:07:36+5:302015-09-05T02:07:36+5:30
गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे व्हावे याकरिता महापालिकेतर्फे अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका

गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज
मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे व्हावे याकरिता महापालिकेतर्फे अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाइट, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी सेवा-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाचे मुख्य केंद्र असलेल्या गिरगाव चौपाटी येथील गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेच्या तयारी कामाचा आढावा उपायुक्त विजय बालमवार यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या वेळी सर्वप्रथम व्हीआयपी कक्षाच्या तयारी कामाची पाहणी करण्यात आली. शिवाय चौपाटीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करून योग्य ते दिशा निर्देश देण्यात आले आहेत. तयारी कामाच्या नकाशामध्ये रेखांकित केलेल्या माहितीचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. नकाशातील बाबींची विभागनिहाय माहिती पाहणीदरम्यान उपस्थितांनी जाणून घेतली. तसेच आपत्कालीन स्थितीत सुरक्षेच्या व कामाच्या सुसूत्रतेच्या दृष्टीने विसर्जनापूर्वी सर्व संबंधित विभागांचे मॉकड्रिल करण्याची सूचनाही करण्यात आली.