शिधावाटप कार्यालयाची बत्ती गुल!; दहा दिवसांपासून कर्मचारी, ग्राहकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:37 AM2019-11-02T00:37:16+5:302019-11-02T00:37:25+5:30

कामाचे तास कर्मचाऱ्यांना अंधार आणि गरमीमध्ये पूर्ण करावे लागत आहेत. अदानी कंपनीकडून त्यांना विजेचा पुरवठा होतो.

Gift of the office of Ghat! The condition of employees, customers for ten days | शिधावाटप कार्यालयाची बत्ती गुल!; दहा दिवसांपासून कर्मचारी, ग्राहकांचे हाल

शिधावाटप कार्यालयाची बत्ती गुल!; दहा दिवसांपासून कर्मचारी, ग्राहकांचे हाल

Next

मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून मालाडच्या शिधावाटप कार्यालयाची बत्ती गुल झाली आहे. राज्य शासनाने बिल न भरल्याने ऐन गरमीत कर्मचारी आणि त्या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना घामटा फुटत आहे.

मालाडच्या एस. व्ही. रोड परिसरात हे शिधावाटप कार्यालय आहे. मालाड पूर्व आणि पश्चिम विभागाची पूर्ण जबाबदारी या कार्यालयावर आहे. दर दिवशी शे-पाचशे लोकांचा गराडा या ठिकाणी असतोच. कामाचा प्रचंड ताण त्यांच्यावर असतानाच ऐन आॅक्टोबरमध्ये त्यांची वीजसेवा खंडित करण्यात आली आहे. कामाचे तास कर्मचाऱ्यांना अंधार आणि गरमीमध्ये पूर्ण करावे लागत आहेत. अदानी कंपनीकडून त्यांना विजेचा पुरवठा होतो. गेल्या काही महिन्यांपासून वीज बिल आणि त्यावर लावण्यात येणारा कर यामुळे अंतिम बिलाची रक्कम चांगलीच फुगली आहे. या थकबाकीबाबत फेब्रुवारी महिन्यात मालाड कार्यालयाला नोटीस देण्यात आली होती. टॅक्स सरकारच आकारते. टॅक्स वगळून बिल देण्यात यावे, असे शिधावाटप कार्यालयाचे म्हणणे आहे.

कामात अडथळे येत आहेत
आमच्याकडे २३ आॅक्टोबरपासून वीज नाही. कामात बरेच अडथळे येत आहेत. तरीदेखील लोकांचे काम आम्ही अडवलेले नाही. याबाबत लवकरात लवकर योग्य ते पाऊल उचलण्यात यावे. - सचिन झेले, शिधावाटप अधिकारी, मालाड

Web Title: Gift of the office of Ghat! The condition of employees, customers for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज