Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : केदार जाधवला सलमान खानकडून गिफ्ट, BCCI कडून व्हिडीओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 20:10 IST

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना पुण्यात होत आहे.

मुंबई - बीसीसीआयने टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाच आणि मराठमोळा क्रिकेटर केदार जाधवचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, केदार जाधव आपल्या पुण्यातील घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या टीम इंडियाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत असून आजचा सामना पुण्यात रंगत आहे. या सामन्यात केदार जाधवला संधी मिळाली नाही. पण, ऑस्ट्रेलियाविरोधात 14 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना पुण्यात होत आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 14 जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडिएमवर होणार आहे. मात्र, आज पुण्यात भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगण्यापूर्वीच बीसीसीआयने ट्विटर अकाऊंटवरुन केदार जाधवचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केदार जाधव आपल्या पुण्यातील ग्रीन हाऊसची माहिती देताना दिसत आहे. केदारचं हे घर त्याचं ड्रीम हाऊस आहे. त्यासोबतच, घराची सजावट अन् मांडणी पाहून तुम्हीही भारावून जाल. या व्हिडीओत घर दाखवताना, केदारने एक स्पेशल भेटही दाखवली आहे. अभिनेता सलमान खानने दिलेली भेट केदारने दाखवली आहे.

सलमानचं गिफ्ट पाहण्यासाठी क्लिक करून व्हिडीओ पूर्ण पाहा

केदार हा सलमान खानचा जबरा फॅन असून तो सलमानची मेमिक्रीही करत असतो. त्यामुळे, सलमान त्याचा चांगला दोस्त बनला आहे. सलमानचा संदर्भ देत केदार व्हिडीओत गिफ्ट दाखवतो. जे जीमचं साहित्य आहे. 

टॅग्स :सलमान खानकेदार जाधवबीसीसीआय