दख्खनच्या राणीला डायनिंग कारची भेट

By Admin | Updated: May 30, 2015 02:01 IST2015-05-30T02:01:22+5:302015-05-30T02:01:22+5:30

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेली डायनिंग कार सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

A gift of a dining car to the Queen of Deccan | दख्खनच्या राणीला डायनिंग कारची भेट

दख्खनच्या राणीला डायनिंग कारची भेट

प्रवासी खूश : १ जूनला वाढदिवस
मुंबई : मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीनला १ जून २०१५ रोजी ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेली डायनिंग कार सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
देशातील पहिली लक्झरी रेल्वे म्हणून मान मिळवलेल्या दख्खनच्या राणीतील डायनिंग कार म्हणजेच चाकांवर चालणारे उपहारगृह हे विशेष आकर्षण होते. ८५ वर्षे रेल्वेसोबत असलेला हा डबा आयुर्मान संपल्याचे कारण देत प्रशासनाने काढून टाकला होता. मात्र प्रवाशांच्या मागणीमुळे ८६व्या वाढदिवसाचे निमित्त साधत डायनिंग कारची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

डेक्कनमधील विशेष आकर्षण म्हणजे येथील डायनिंग कार. मुंबई-पुणे असे अवघे सव्वातीन तासाचे अंतर कापणाऱ्या या रेल्वेत ३२ प्रवासी क्षमता असलेली डायनिंग कार आहे. चंदेरी आणि शाही निळ््या रंगांने रंगवलेल्या डेक्कनला मधोमध एक सुवर्ण रेषा होती. अशा या मनमोहक रेल्वेला सुरूवातीस केवळ ७ डबे होते. कालांतराने त्यात वाढ झाल्याने प्रथम १२ आणि १७ डबे झाले आहेत. सध्या डेक्कनची प्रवाशी क्षमता १ हजार ४१७ इतकी आहे.

Web Title: A gift of a dining car to the Queen of Deccan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.