अंधेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड
By Admin | Updated: November 1, 2014 23:14 IST2014-11-01T23:14:35+5:302014-11-01T23:14:35+5:30
अंधेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड

अंधेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड
अ धेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड मुंबई: अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील मधुबन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील सोने तयार करण्याच्या कारखान्यातून ५७ लाख रुपये किंमतीचे सोने चोरी केल्याची घटना २७ नोव्हेंबरला घडली होती. या चोरीची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणी एका चोराला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. संतोष नायर (४७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर घरफोडीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९५ गुन्ह्यांची नोंद आहे. या चोरीचा तपास गुन्हे ९ शाखाही करत होती त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिलीप सावंत यांना सूत्रांकडून माहिती मिळाली असता, त्यांंनी नायरला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने चोरी केल्याची कबुली दिली तसेच या परिसरातील गिरीकुंज इस्टेट येथे १५ ऑक्टोबरला चोरी केल्याचेही सांगितले. पोलिसांनी नायरकडून २२ लाख किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. या चोरीत त्याच्या इतर दोन साथीदारांचाही सहभाग होता. इतर दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम मडगे यांनी दिली. (प्रतिनिधी)