महाराष्ट्र घरेलू कामगार अधिनियम २००८ च्या कलम ३ अंतर्गत घरेलू कामगार मंडळाची स्थापना १२ ऑगस्ट २०११ रोजी झाली. मुंबई पश्चिम उपनगर कार्यक्षेत्रात वांद्रे ते दहिसर येथील हद्दीत आतापर्यंत ८ हजार ५१९ घरेलू कामगारांची नोंदणी झाली आहे.
कोणते लाभ मिळतात?अंत्यविधी सहाय्य- मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसाला दोन हजार रुपये मिळतात.
प्रसुती लाभ- ३१ जुलै २०१४ पर्यंत वयोगट ५५ ते ६० वर्षातील नोंदीत घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आलेत.
ई-श्रम पोर्टलसाठी निकष कोणते?- वय १६ ते ५९ मध्ये असावे. - आयकर भरणारा व्यक्ती नसावा. - इपीएफओ आणि इएसआयसीचे सदस्य नसावेत.- असंघटित कामगार श्रेणीत कार्यरत असणे आवश्यक आहे.
ई-श्रम पोर्टल आहे तरी काय?असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरवण्यासाठी त्यांचा राष्ट्रीयस्तरावर डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २६ ऑगस्ट २०११ पासून त्यांच्या नोंदणीसाठी ई-श्रम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. सद्यस्थितीत कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत राज्यातील ३६ हजार असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती?वयाचा पुरावा (जन्माचा दाखला, शाळा सोडल्याला दाखला) आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, रेशनकार्ड, बँक पासबुक, अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
आतापर्यंत नोंदणी किती?वयाची १८ वर्ष पूर्ण परंतु ६० वर्षे पूर्ण न झालेल्या घरेलू कामगारांची लाभार्थी म्हणून १४ नोव्हेंबर २०११ पासून नोंदणी करण्यात येते. कामगार उपायुक्त, मुंबई पश्चिम उपनगर कार्यक्षेत्रात वांद्रे ते दहिसर येथील हद्दीत ८ हजार ५१९ घरेलू कामगारांची नोंदणी झाली आहे.
कशी असते मंडळाची रचना?अध्यक्ष- प्रधान सचिव (कामगार)सदस्य सचिव- कामगार आयुक्तशासन प्रतिनिधी- ५ सदस्य, घरेलू कामगार प्रतिनिधी- ११ सदस्य, मालक प्रतिनिधी- ११ सदस्यएकूण सदस्य संख्या- २८