घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन
By Admin | Updated: December 11, 2014 02:02 IST2014-12-11T02:02:22+5:302014-12-11T02:02:22+5:30
महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा आणि वेतन ठेकेदाराकडून वेळेत मिळत नसल्याचा आरोप करून बुधवारी घंटागाडी कर्मचा:यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.

घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन
ठाणो : महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा आणि वेतन ठेकेदाराकडून वेळेत मिळत नसल्याचा आरोप करून बुधवारी घंटागाडी कर्मचा:यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांना घेराव घालण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे शहरातील बहुतेक भागांत घंटागाडय़ा फिरकल्याच नाहीत. त्यामुळे आता पुन्हा कच:याचे ढीग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वेळेत वेतन न देण्याच्या मुद्यावरून ठेकेदार आणि कर्मचा:यांमधील वाद पुन्हा उफाळला आहे. शहरातील विविध भागांत कचरा उचलणा:या 3क् मोठय़ा आणि 34 छोटय़ा अशा 64 घंटागाडय़ांवरील कामगारांनी कामबंदचे हत्यार उपसले आहे. त्यांनी महापौर संजय मोरे आणि विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्यासमोर ठेकेदाराच्या मनमानीचा पाढाच वाचला. रस्ते सफाई आणि शौचालय सफाई कामगारांनाही वेतन वेळेवर मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तब्बल 18क्क् कामगार ठेकेदारांमार्फत घंटागाडी, रस्ते सफाई आणि शौचालय सफाईची कामे करीत आहेत. काही वर्षापासून घंटागाडी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यात वाद सुरू आहेत. वर्षभरापूर्वी 15 दिवसांचे कामबंद आंदोलन करण्यात आले होते. ठेकेदाराच्या मनमानीविरोधात रायलादेवी, वर्तकनगर, घोडबंदर भागातील घंटागाडी कर्मचा:यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य केल्या नाहीत, तर इतर भागांतील घंटागाडय़ा बंद करण्याचा इशाराही दिला. (प्रतिनिधी)
या आंदोलनाचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि रामभाऊ तायडे यांनी प्रशासनाला धारेवर धरून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. ठेकेदाराला महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात पैसे दिले जात असल्याची माहिती उपायुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.
परंतु, ते दिले नसतील तर ते देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला आदेश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कामगारांना थेट पगार देण्यात यावा, यासंदर्भातील ठराव दीड वर्षापूर्वी झाला असताना त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. त्यानुसार ठेकेदाराबरोबर कशा पद्धतीने करारनामे केले आहेत, त्याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश सभापती सुधाकर चव्हाण यांनी प्रशासनाला दिले.
18क्क् कामगार ठेकेदारांमार्फत घंटागाडी, रस्ते सफाई आणि शौचालय सफाईची कामे करीत आहेत. काही वर्षापासून घंटागाडी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यात वाद सुरू आहेत. वर्षभरापूर्वी 15 दिवसांचे कामबंद आंदोलन करण्यात आले होते. मागण्या मान्य केल्या नाहीत, तर इतर भागांतील घंटागाडय़ा बंद करण्याचा इशाराही दिला.
च्पालिकेने कामगारांच्या 21 दिवसांच्या रजेचे सुमारे पाच
कोटी ठेकेदाराला दिले आहेत,
मात्र ते अद्याप कामगारांना मिळालेले नाहीत.
च्करारानुसार 1क् तारखेर्पयत कर्मचा:यांना वेतन देणो बंधनकारक आहे, पण ‘पालिका मला पैसे देत नाही, त्यामुळे मी तुम्हाला वेतन देऊ शकत नाही,’ अशी सबब ठेकेदार देतो, असे कर्मचा:यांचे म्हणणो आहे.
च्ठेकेदारांना रस्ते सफाईच्या कामासाठी 5क् कामगारांचे वेतन दिले जाते. परंतु, प्रत्यक्षात 3क् कामगारांकडून काम करून घेतले जाते, असा आरोपही त्यांनी केला.