चारित्र्याच्या संशयावरून घणसोलीत पत्नीची हत्या

By Admin | Updated: December 3, 2014 02:38 IST2014-12-03T02:38:40+5:302014-12-03T02:38:40+5:30

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घणसोली सावली तलाव परिसरात घडली आहे.

Ghansaloli wife murdered by character suspect | चारित्र्याच्या संशयावरून घणसोलीत पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून घणसोलीत पत्नीची हत्या

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घणसोली सावली तलाव परिसरात घडली आहे. सोमवारी मध्यरात्री पत्नीच्या डोक्यात घाव करून तिला ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
सेक्टर २ येथील सावली तलाव परिसरात राहणाऱ्या राजेंद्र चौधरी (३५) याचा पत्नी मीनाक्षी (३०) हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. सोमवारी देखील या पती-पत्नीमध्ये जोराचे भांडण झाले होते. यावेळी रागामध्ये राजेंद्र याने पत्नी मीनाक्षी हिच्या डोक्यात लोखंडी वस्तूने घाव केले. या प्रकारात गंभीर जखमी होऊन मीनाक्षी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी पती राजेंद्र याच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्याला त्याला अटक करून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ghansaloli wife murdered by character suspect