गुहागरात भास्कर जाधवांसाठी ‘खतरों की बात’

By Admin | Updated: September 25, 2014 00:21 IST2014-09-24T22:43:40+5:302014-09-25T00:21:48+5:30

काँग्रेसची सूत्र नीलेश राणेंकडे येऊन कोणत्याही स्थितीत भास्कर जाधव यांना पाडण्याची मोहीम राबवली जाईल व हीच काँग्रेसची मते निर्णायक ठरतील, अश्ी स्थिती

Ghahagrat Bhaskar Jadhav 'talk of dangers' | गुहागरात भास्कर जाधवांसाठी ‘खतरों की बात’

गुहागरात भास्कर जाधवांसाठी ‘खतरों की बात’

गुहागर : गुहागर मतदारसंघाने या विधानसभा निवडणुकीत संघर्षमय लढत होऊन काही हजारांच्या फरकाने कोणताही उमेदवार विजयी होईल, असे राजकीय संकेत मिळत नसताना आघाडी झाली नाही तर काँग्रेसची सूत्र नीलेश राणेंकडे येऊन कोणत्याही स्थितीत भास्कर जाधव यांना पाडण्याची मोहीम राबवली जाईल व हीच काँग्रेसची मते निर्णायक ठरतील, अश्ी स्थिती निर्माण होईल.
युतीच्या जागा वाटपाच्या वादाला तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व विनय नातू यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. ते राज्यमंत्री झाले. जाधव यांच्या आक्रमक शैलीमुळे नारायण राणे वर्षभरातच दुखावले गेले. यातून दोघांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद निर्माण होऊन पक्ष कार्यालये फोडण्यापर्यंत मजल गेली. पुढे हा वाद राजकीय पटलावर मिटला असल्याचे दाखवले गेले तरी वारंवार नीलेश राणे हे भास्कर जाधवांबद्दलचा राग आपल्या भाषणातून व्यक्त करत आहेत. लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुखावलेल्या नीलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना धडा शिकवण्याचा विडा उचलला आहे.
काँग्रेस पक्षाची येथील मागील काही वर्षाची स्थिती पाहता एकवेळ रामभाऊ बेंडल आमदार झाले. राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मानंतर बहुतांश काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये विलीन झाले तेव्हापासून काँग्रेसची पीछेहाट सुरु आहे. मागील दोन टर्म पूर्वी गुहागर पंचायत समितीमध्ये एकमेव बेलवलकर या पाटपन्हाळे गणातून निवडून आल्या होत्या. मागील निवडणुकीमध्ये कॉग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही उमेदवार विजयी झाला नाही. यावेळची स्थिती पाहता भास्कर जाधव यांचा उजवा हात समजले जाणारे रामदास राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये विनय नातूंना कडवी झुंज देणारे चंद्रकांत बाईत व सुरेश कातकर या तिघांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. आघाडी न झाल्यास ा्रत्यक्षात नीलेश राणे यांनी आपली इच्छा याआधीच जाहीर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना जोमाने निवडणुकीत उतरवले जाईल व हीच जाधव यांना डोकेदुखी ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ghahagrat Bhaskar Jadhav 'talk of dangers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.