Join us  

'बायकर ट्राईड टू हरॅस माय फ्रेंड!' जुहू पोलीस घेत आहेत, त्या 'ट्वीट' कराचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:46 AM

'गेटींग रेडी फॉर जुहू मॅरेथॉन, सम बायकर ट्राईड टू हरॅस माय फ्रेंड', असे एक ट्विट रविवारी सकाळी मुंबई पोलिसांना करण्यात आले. जुहूमध्ये हा प्रकार घडला असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला होता.

ठळक मुद्दे'गेटींग रेडी फॉर जुहू मॅरेथॉन, सम बायकर ट्राईड टू हरॅस माय फ्रेंड', असे एक ट्विट रविवारी सकाळी मुंबई पोलिसांना करण्यात आले.जुहूमध्ये हा प्रकार घडला असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला होता. अद्याप संबंधित 'ट्विट' कराने  पोलिसांना संपर्क न केल्याने तपासाची गती मंदावली असुन त्याचाच शोध घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - 'गेटींग रेडी फॉर जुहू मॅरेथॉन, सम बायकर ट्राईड टू हरॅस माय फ्रेंड', असे एक ट्विट रविवारी सकाळी मुंबईपोलिसांना करण्यात आले. जुहूमध्ये हा प्रकार घडला असल्याचा उल्लेख ट्वीटमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तक्रारदाराला संपर्क करण्यासाठी अधिक माहिती मागितली. मात्र अद्याप संबंधित 'ट्विट' कराने  पोलिसांना संपर्क न केल्याने तपासाची गती मंदावली असुन त्याचाच शोध घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जुहूमध्ये रविवारी अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठया प्रमाणात इच्छुक त्यात सहभागी झाले होते. त्याच दरम्यान 'मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही तयारी करत होतो. त्यावेळी एक मोटरसायकलस्वार माझ्या फ्रेंडला त्रास देऊ लागला. जुहू, रस्ता क्रमांक ८ वर हा प्रकार घडला. त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न मी केला मात्र पहाटेची वेळ असल्याने तो तितकासा स्पष्ट येऊ शकला नाही', अशी माहिती हितेश नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीने पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी ट्वीट करणाऱ्याला संपर्क कसा करता येईल याबाबत विचारणा केली. मात्र त्यानंतर त्याने काहीच उत्तर दिलेले नाही. तसेच त्याने 'फ्रेंड' म्हणुन उल्लेख केलेली व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तरीही घटनास्थळीच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलीस करत आहेत. ट्विट करण्यात आलेल्या फोटोमध्ये छेडछाडीचा आरोप असलेल्या मोटरसायकलस्वाराचा चेहरा तसेच गाडी क्रमांक देखील स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे याप्रकरणी तक्रारदाराने पुढाकार घेत सहकार्य करण्याची विनंती जुहू पोलिसांनी केली आहे. जेणेकरून संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर जेरबंद करता येईल असे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखा देखील तपास करत आहे.

टॅग्स :पोलिसमुंबई