Join us
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे. रुग्णालयात नव्या वैद्यकीय सुविधांमुळे घ्या अद्ययावत उपचार; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सुसज्ज आरोग्य सुविधांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 07:41 IST

आता प्रशिक्षणालाही चालना

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितीत  जे. जे. रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या सुविधांमुळे उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशिक्षणालाही यामुळे  चालना मिळणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मुश्रीफ यांच्या हस्ते प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज तीन शस्त्रक्रियागृह, दोन अद्ययावत रुग्णकक्ष, केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आणि सीबीएमई स्किल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. मनोज जामसुतकर, प्रधान सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रंजीत मानकेश्वर, उपअधिष्ठाता  डॉ. गजानन चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे उपस्थित होते.  केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केला आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण, संसर्ग नियंत्रण व सुरक्षित साहित्य पुरवठा यामुळे रुग्णालयीन स्वच्छता आणखी उत्तम होणार आहे. 

सीबीएमई स्किल लॅब 

शैक्षणिक दृष्टीने सातव्या मजल्यावरील सभागृह आणि सीबीएमई स्किल लॅब सुरू करण्यात आली आहे. सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय शिक्षण मानकांनुसार प्रशिक्षण मिळणार आहे.

सर्वसमावेशक सुधारणांमुळे रुग्णांना विशेष उपचार मिळतील. संसर्ग नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता आणि शैक्षणिक प्रशिक्षण विस्तार यांना मोठी चालना मिळेल. राज्यातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल.

डॉ. अजय भांडारवार,

अधिष्ठाता, जेजे रुग्णालय

अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर 

मेंदूतील गाठी, रक्तस्राव, अपघाती दुखापती आणि मणक्यांशी संबंधित शस्त्रक्रियांसाठी प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले.

ईएनटी (कान-नाक-घसा) विभागात स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले असून टॉन्सिलेक्टॉमी, कर्णपटल दुरुस्ती आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया येथे केल्या जाणार आहेत.

स्वतंत्र बाल शस्त्रक्रिया कक्ष; बालस्नेही सुविधा

बालरुग्णांसाठी स्वतंत्र बाल शस्त्रक्रिया कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जन्मजात विकृती, हर्निया आणि अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया बालस्नेही पायाभूत सुविधांसह उपलब्ध करण्यात येणार आहेत.

रुग्णकक्ष क्रमांक ११ व १८ मध्ये वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित पायाभूत सुविधा  असून, शस्त्रक्रियेपूर्व आणि शस्त्रक्रियापश्चात सेवांसाठी सुसज्ज व्यवस्था आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : JJ Hospital Upgrades: Advanced medical facilities inaugurated for better patient care.

Web Summary : JJ Hospital unveils advanced facilities, including operation theaters and skill labs. Minister Hasan Mushrif inaugurated the upgrades, enhancing patient care and medical training with modern technology and specialized pediatric surgery units.
टॅग्स :हॉस्पिटल