बांधकाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढा, राष्ट्रीय मिल मजदूर संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:57 AM2017-10-25T01:57:26+5:302017-10-25T01:57:32+5:30

मुंबई : गिरणी कामगार घरकूल योजनेअंतर्गत ज्या जमिनींवर घरांचे बांधकाम चालू आहे, त्या घरांची सोडत एमएमआरडीएच्या घरांच्या सोडतीपूर्वी काढावी, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे केली आहे

Get rid of ongoing construction of houses, National Mill Workers Union | बांधकाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढा, राष्ट्रीय मिल मजदूर संघ

बांधकाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढा, राष्ट्रीय मिल मजदूर संघ

Next

मुंबई : गिरणी कामगार घरकूल योजनेअंतर्गत ज्या जमिनींवर घरांचे बांधकाम चालू आहे, त्या घरांची सोडत एमएमआरडीएच्या घरांच्या सोडतीपूर्वी काढावी, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे केली आहे. गिरण्यांच्या जागेवर आता गिरणी कामगारांना घरे मिळणार नाहीत, असा कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी म्हाडाने बांधकाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढण्याचे आवाहन संघटनेने केल्याची माहिती संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.
गिरणी कामगारांच्या घराच्या वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सनियंत्रण समितीच्या अध्यक्षांनी सूचित केल्याप्रमाणे म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या जमिनीवरील घरांची सोडत काढण्याची मागणी संघाने केली होती. ती मान्य झाल्याचा दावा मोहिते यांनी केला आहे.
मोहिते म्हणाले की, घरे तयार करतानाच सोडत काढली, तरी अर्जांची छाननी आजच्याप्रमाणेच सुरू ठेवावी. एमएमआरडीएच्या घरांची सोडत येत्या दोन महिन्यांत काढण्यात यावी. त्यातून कामगारांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होईल. तशा सूचनाही बैठकीत मांडण्यात आल्या आहेत. पात्रतेसाठी पुराव्यांची तपासणी करताना कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला या प्रक्रियेत सामील करण्याचीही सूचना कामगार सहायक आयुक्तांनी मान्य केली आहे. एकाच कामगाराने अनेक वेळा अर्ज भरले असतील, तर १९८२ सालची अट लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची काटेकोर छाननी करण्यात यावी. कामगारांच्या माहितीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या कामगारांच्या नावांची यादीही शासनाने जाहीर करावी. जेणेकरून कामगारांना यादी पाहता येईल.
>...तर प्रतीक्षा यादीतील कामगारांना संधी द्या!
ज्या कामगारांना यापूर्वीच घरे लागली आहेत, मात्र त्यांनी आवश्यक पुरावे सादर केलेले नाहीत, त्यांची नावे तहकूब यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन संघाने केले आहे. शिवाय सोडत लागलेल्या कामगारांना दोन ते तीन वेळा नोटीस देऊनही तो येत
नसेल, तर प्रतीक्षा यादीतील कामगाराला संधी देण्याची मागणी संघाने केली आहे.

Web Title: Get rid of ongoing construction of houses, National Mill Workers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा