Join us

मुंबईची ‘एफ १’ निघाली जर्मनीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 02:41 IST

जर्मनीमध्ये ५ ते ११ आॅगस्ट या कालावधीत होणाºया स्पर्धेमध्ये जगभरातून १२० टीम सहभागी होणार

जर्मनीमध्ये होणाऱ्या फॉम्युर्ला स्टुडंट, या जागतिक विद्यार्थी फॉम्युर्ला रेसिंग स्पर्धेमध्ये के. जे. सोमय्या कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगची टीम ओरिअन रेसिंग इंडिया सहभागी होणार आहे. तीन मुलींसह ६० विद्यार्थ्यांचा ओरिअन रेसिंग इंडियाच्या टीममध्ये समावेश आहे़ इंजिनीअरिंगच्या पहिल्या ते चौथ्या वर्षातील हे विद्यार्थी आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी ‘आर्टेमिस’ या पहिल्या इलेक्ट्रिक व्हेइकलचे अनावरण सोमवार १० जून रोजी केले.

जर्मनीमध्ये ५ ते ११ आॅगस्ट या कालावधीत होणाºया स्पर्धेमध्ये जगभरातून १२० टीम सहभागी होणार असून या स्पर्धेत ते त्यांची डिझाइन, इंजिनीअरिंग व प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये दाखविणार आहेत. आर्टेमिस या पहिल्या इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी ही टीम गेले १५ महिने संशोधन, विकास, डिझाइनिंग, उत्पादन व व्हॅलिडेशन यावर काम करीत आहे. ही रेसिंग कार म्हणजे फॉर्म्युला रेस कार असून ती ४ सेकंदांत ० ते १०० मीटर जाते व तिचे वजन २३० किलो आहे.

टीम ओरिअन रेसिंग इंडियाच्या (ओआरआय) आजवरच्या यशाबद्दल आम्ही समाधानी व खूश आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे प्रोत्साहन देतो. टीमवर्क, संयोजन कौशल्य, मार्केटिंग आणि विशिष्ट मुदतीत व तणावाखाली काम करणे हे महत्त्वाचे पैलू त्यांना सहभागी झाल्यावर व स्पर्धा केल्यावर शिकायला मिळतात, अशी प्रतिक्रिया के. जे. सोमय्या कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या प्राचार्य डॉ. शुभा पंडित यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईजर्मनी