‘उबर’च्या महाव्यवस्थापकाला धक्काबुक्की

By Admin | Updated: December 11, 2014 02:12 IST2014-12-11T02:12:49+5:302014-12-11T02:12:49+5:30

उबर या खासगी टॅक्सी पुरविणा:या कंपनीचे महाव्यवस्थापक शैलेश सावलानी यांना स्वाभिमान संघटनेच्या पदाधिका:यांनी धक्काबुक्की केली.

The general manager of 'Uber' was shocked | ‘उबर’च्या महाव्यवस्थापकाला धक्काबुक्की

‘उबर’च्या महाव्यवस्थापकाला धक्काबुक्की

मुंबई : उबर या खासगी टॅक्सी पुरविणा:या कंपनीचे महाव्यवस्थापक शैलेश सावलानी यांना स्वाभिमान संघटनेच्या पदाधिका:यांनी धक्काबुक्की केली. 
     दिल्लीत उबर टॅक्सी चालकाने 25वर्षीय तरुणीवर केलेल्या बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर ही संतप्त प्रतिक्रिया उमटली. बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) आयुक्त महेश झगडे यांनी वांद्रे येथील कार्यालयात खासगी टॅक्सी कंपनी चालकांची बैठक बोलावली होती. ही बैठक संपल्यानंतर आरटीओ कार्यालयातून बाहेर पडल्यावर सावलानी यांच्यासोबत हा प्रकार घडला. मात्र याबाबत सावलानी यांनी मारहाणाबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. खेरवाडी पोलिसांनीही अशी कोणतीही तक्रार मिळालेली नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The general manager of 'Uber' was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.