Join us

"रत्ने व दागिने क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे, या उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:20 IST

भारतातील रत्ने आणि दागिने हा उद्योग प्रचंड मोठा असून यातून होणारी वार्षिक निर्यात ४० अब्ज डॉलर्सपर्यंत आहे. भारताच्या जीडीपीसह रोजगारात या क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे...

मुंबई : आयटी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे रत्ने आणि दागिने हे मोठे क्षेत्र असल्याने याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. यात सरकारी पातळीवर येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत लोकमत एडिटाेरिअल बाेर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा खासदार डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केले. येथील ‘आयआयजेएस प्रिमिअर-२०२५’ शोला डॉ. विजय दर्डा यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी शोच्या आयोजनासह याला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल कौतुक केले. 

जीजेईपीसीचे (जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल) अध्यक्ष किरीट भन्साळी, जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे समन्वयक निरव भन्साळी, कलर्ड जेमस्टोन्स पॅनलचे समन्वयक डी. पी. खंडेलवाल, गुजरातचे विभागीय चेअरमन जयंतीभाई एन. सावलिया, डायमंड पॅनलचे सदस्य आशीष बोर्डा आणि जीजेईपीसीचे कार्यकारी संचालक सव्यसाची रे आदींनी डॉ. दर्डा यांचे स्वागत केले. या वेळी उद्योग जगतातून कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक टी. एस. कल्याणरामन, किरण जेम्सचे संचालक  दिनेश लखानी आणि कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश तसेच राजेश कल्याणरामन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. दर्डा यांच्या या भेटीदरम्यान खरेदीदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पाचव्या दिवसाच्या दुपारपर्यंत ५५,००० हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली होती. यात २,५०० आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचा समावेश आहे. नेस्को आणि जेडब्ल्यूसीसी दोन्ही ठिकाणी हा परिसर गर्दीने फुलला होता. या उद्योगाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख व भक्कम स्थान मिळवून देण्यात जीजेईपीसीच्या भूमिकेचे डॉ. दर्डा यांनी कौतुक केले. जॉय अलुकस ज्वेलरीचे अध्यक्ष जॉय अलुकस, हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया, दुबई येथील ब्रिलियंट डायमंडचे चेअरमन परेश शाह, लक्ष्मी डायमंडचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गजेरा तसेच इंट्रिया ज्वेल्सच्या संस्थापिका आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर पूर्वा कोठारी या वेळी उपस्थित होत्या.

या उद्योगाचे जीडीपीत महत्त्वपूर्ण योगदानभारतातील रत्ने आणि दागिने हा उद्योग प्रचंड मोठा असून यातून होणारी वार्षिक निर्यात ४० अब्ज डॉलर्सपर्यंत आहे. भारताच्या जीडीपीसह रोजगारात या क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.  रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (जीजेईपीसी) त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी अधिवेशने तसेच प्रदर्शने आयोजित करण्याच्या दृष्टीने स्वतःचे कन्व्हेन्शन सेंटर असले पाहिजे, असेही डॉ. दर्डा म्हणाले.

टॅग्स :विजय दर्डामुंबईदागिने