उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 24, 2023 19:04 IST2023-12-24T19:04:23+5:302023-12-24T19:04:37+5:30

गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास उत्तर मुंबईच्या हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.

Geeta Jayanti Festival concludes in North Mumbai | उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप

उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप

मुंबई : गीता जयंतीनिमित्त कांदिवली (पश्चिम) येथील पोईसर जिमखाना येथे दिव्य कृष्णलीला नृत्य, श्रीमद भगवद्गीतेवरील व्याख्यान व सत्कार समारंभाचे काल रात्री आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ.सितारा देवी यांच्या कन्या श्रीमती जयतिमाला मिश्रा आणि त्यांच्या ग्रुपने कृष्णलीला नृत्य सादर केले.गेल्या दोन वर्षात श्रीमद्भगवद्गीता प्रचार समिती आणि पोयसर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास उत्तर मुंबईच्या हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.

जगातील महान धर्मग्रंथ श्रीमद भागवत गीता हा संपूर्ण मानवी जीवनाच्या प्रारब्ध आणि पुरुषार्थचा पाया आहे. कर्म, ज्ञान, दुःख, मोक्ष आणि शाश्वत आनंदाचा हा महान ग्रंथ मानवी जीवनात पुन्हा प्रस्थापित करण्याचा उच्च आदर्श घेऊन श्रीमद भागवत गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी खा.गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेच्या पटलावर २०२१ मध्ये मांडली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार ( एनसीईआरटी) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत या ग्रंथाचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी उपस्थित कृष्णप्रेमी नागरिकांना पुष्टीमार्गी गोस्वामी श्री १०८ राजकुमार महाराजश्री, मिरा रोड इस्कॉन मंदिराचे श्री भीमा प्रभु, जुहू इस्कॉन संस्थेचे श्री कृष्ण भजनदास  यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर ध्यानात्मक प्रवचनाने संबोधित केले.

या कार्यक्रमादरम्यान ज्यांनी गेल्या दोन वर्षांत श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रचारात योगदान दिले आहे, त्यांना खा.गोपाळ शेट्टी आणि इस्कॉनचे स्वामी श्री कृष्ण भजन दास जी यांच्या आशीर्वादाने सन्मानित करण्यात आले.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, "तुमच्या मुलांना लहानपणापासूनच श्रीमद्भगवद्गीतेची सवय लावा. त्याला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. आजच्या युगात या महान शास्त्राचा आधार घेऊन जीवनातील सर्वोत्तम कर्म करायचे आहे.

यावेळी  पुष्टिमार्ग गोस्वामी राजकुमार महाराज, मीरा रोड इस्कॉन मंदिराचे  भीमा प्रभु, जुहू इस्कॉन संस्थेचे कृष्ण भजनदास, दहिसरच्या आमदार मनीषा  चौधरी,  पोईसर जिमखाना अध्यक्ष मोहन भंडारी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, गीता जयंती उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष, भाजप नेते डॉ.योगेश दुबे, भाजपचे ज्येष्ठ नेते अँड.जे.पी.मिश्रा, उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, भाजप मुंबई सचिव विनोद शेलार, आचार्य पवन त्रिपाठ, अँड.ज्ञानमूर्ती शर्मा, श्रीकांत पांडे, गंगाराम जमनानी, योगेश वर्मा, नीलाबेन सोनी, तसेच उत्तर मुंबईतील भाजपाच्या माजी नगरसेवकांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने कृष्णप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Web Title: Geeta Jayanti Festival concludes in North Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई