गझलकार मनोहर रणपिसे यांचे निधन
By Admin | Updated: September 3, 2015 01:08 IST2015-09-03T01:08:54+5:302015-09-03T01:08:54+5:30
ज्येष्ठ गजलकार मनोहर रणपिसे यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे

गझलकार मनोहर रणपिसे यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ गजलकार मनोहर रणपिसे यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रणपिसे हे कर्करोगाने अनेक महिन्यांपासून आजारी होते. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणत्याही प्रकारचा रसिकवर्ग असला तरी त्यांच्या गझलांना हमखास दाद मिळत असे. ते आपली गझल सक्षम सादरीकरणाने समोरच्या अंत:करणात पोहोचवायचे, ही त्यांची खासियत होती. ‘मृगजळाचे गाव माझे’, ‘शुभ्र कमळांचे तळे’, ‘सुफी’, ‘वाळूची घरे’, ‘प्रेषित’, ‘अद्वैत’, ‘बहरलेलं झाड’, ‘अंतर्यामी’, ‘निर्वाण’, ‘कोरा कागद’ हे त्यांचे गजलसंग्रह विशेष गाजले. ‘निसर्ग आणि मी’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे. (प्रतिनिधी)