गोळीबार करून फरार झालेला आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 06:20 IST2019-05-28T06:20:41+5:302019-05-28T06:20:43+5:30
टँकरचालकांमध्ये झालेल्या भांडणानंतर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला ६ वर्षांनी गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

गोळीबार करून फरार झालेला आरोपी गजाआड
मुंबई : टँकरचालकांमध्ये झालेल्या भांडणानंतर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला ६ वर्षांनी गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अन्सारी अलील अब्दुल मोबीन (२५) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
वरणगावात (जि.जळगाव) २०१३ साली हा गुन्हा घडला. मोबीनविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर तो पसार झाला होता.
सोमवारी तो चेंबूर परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. पोलीस निरीक्षक आबूराव सोनावणे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.