सुडापोटी गुन्ह्यात गोवले - चौगुले

By Admin | Updated: June 6, 2015 22:42 IST2015-06-06T22:42:17+5:302015-06-06T22:42:17+5:30

आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे.

Gawaye - Chougule | सुडापोटी गुन्ह्यात गोवले - चौगुले

सुडापोटी गुन्ह्यात गोवले - चौगुले

नवी मुंबई : आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे. केवळ राजकीय सुडापोटी पोलिसांच्या मदतीने हा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे राज्यात वडार समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात समाजातर्फे १० जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यावर १६ डिसेंबर २०१४ रोजी सीबीडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामुळेच त्यांना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. खारघर येथे राहणाऱ्या तरुणीने त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केलेली आहे. मात्र राजकीय सुडापोटी आपल्याला या गुन्ह्यात गुंतवले गेल्याचे चौगुले यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणूक पूर्वीपासून संबंधितांचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते, असेही त्यांनी वाशी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तक्रारदार तरुणी कोपरखैरणेची राहणारी असून तिचा खारघरला फ्लॅट आहे. हा फ्लॅट देखील चौगुले यांनीच दिलेला आहे. त्यामुळे कोणताही संबंध नसलेल्या सीबीडी पोलीस ठाण्यातच तक्रार का दाखल झाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी विरोधकांच्या या सुडामध्ये हे केल्याचा आरोप चौगुले यांनी केला.

Web Title: Gawaye - Chougule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.