गौरव, दिव्या यांना विजेतेपद

By Admin | Updated: May 12, 2017 02:05 IST2017-05-12T02:05:48+5:302017-05-12T02:05:48+5:30

गौरव ओछानी आणि दिव्या सरैया यांनी आपआपल्या गटात बाजी मारताना पहिल्या १८ वर्षांखालील मुंबई पिकलबॉल अजिंक्यपद

Gaurav, Divya won the title | गौरव, दिव्या यांना विजेतेपद

गौरव, दिव्या यांना विजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गौरव ओछानी आणि दिव्या सरैया यांनी आपआपल्या गटात बाजी मारताना पहिल्या १८ वर्षांखालील मुंबई पिकलबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दरम्यान, या स्पर्धेतून पुढील आठवड्यात अहमदनगर येथे रंगणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई संघाचीही निवड करण्यात आली.
मुंबई जिल्हा पिकलबॉल संघटनेच्या वतीने आणि आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) मान्यतेने विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत गौरव व दिव्या यांनी वर्चस्व राखले. गौरवने आक्रमक खेळाच्या जोरावर प्रणव डोईफोडेचे आव्हान ११-५, ११-८ असे परतवून मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये दिव्याने चुरशीच्या
झालेल्या सामन्यात भक्ती आडिवरेकरविरुद्ध ११-८, ११-७ अशी बाजी मारली.
मुलांच्या दुहेरी गटात गौरव राणे - कश्यप बरणवाल यांनी जेतेपदाला गवसणी घालताना देवेश कदम-रोहित दुधाम यांचा ११-७, ११-९ असा पाडाव केला, तसेच मुलींमध्ये भक्तीने एकेरीतील अपयश धुऊन काढताना, इशा सकपाळसह चमकदार खेळ करत तीन सेटपर्यंतच्या थरारक सामन्यात काव्या प्रभू-श्रावणी जाधव यांचा
८-११, ११-६, ११-० असा पराभव केला. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतरही भक्ती-इशा यांनी जबरदस्त पुनरागमन करताना वर्चस्व मिळवले.

Web Title: Gaurav, Divya won the title