Join us

गेट - जॅम अभ्यासक्रम प्रवेश तारखा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 03:08 IST

गेट- २०२४ च्या समिती बैठकीत या तारखा निश्चित करण्यात आल्या.

मुंबई : देशभरातील आयआयटी, एनआयटी अशा केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘गेट’ - ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग आणि ‘जॅम’ - जॉईंट ॲडमिशन टेस्ट फॉर मास्टर्ससाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार ३, ४, १० आणि ११ फेब्रुवारीला ‘गेट’ होईल; तर ११ फेब्रुवारीला ‘जॅम’ होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या संदर्भातील माहिती परिपत्रकाद्वारे दिली. देशभरातील सात आयआयटी आणि बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यातर्फे ‘गेट’ परीक्षा घेतली जाते. गेट- २०२४ च्या समिती बैठकीत या तारखा निश्चित करण्यात आल्या.

विद्यापीठे, महाविद्यालयांनाही सूचनाया परीक्षेच्या तारखा विचारात घेऊन विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी त्यांचे शैक्षणिक कामकाज आणि परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्याची सूचना एआयसीटीईने केली आहे.

टॅग्स :परीक्षा