Join us

धारावीत गॅस सिलिंडरचा स्फोट, 14 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:23 IST

Gas cylinder blast : धारावीतील शाहू नगरमध्ये मुबारक हॉटेलच्यासमोर असलेल्या एका घरात दुपारी पावणे एकच्या सुमारास हा स्फोट झाला.

मुंबई : धारावीतील शाहू नगरमध्ये एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत जवळपास 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धारावीतील शाहू नगरमध्ये मुबारक हॉटेलच्यासमोर असलेल्या एका घरात दुपारी पावणे एकच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटामुळे 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 पैकी दोन जण जवळपास 70 टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे. तर बाकीचे किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना आगीची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. दोन फायर इंजिन, एक जंबो वॉटर टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :स्फोटमुंबई