चेंबूरमध्ये घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट

By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:21+5:302014-08-25T21:40:21+5:30

चेंबूरमध्ये घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट

The gas cylinder blast in Chembur | चेंबूरमध्ये घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट

चेंबूरमध्ये घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट

ंबूरमध्ये घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट
एकाचा मृत्यू, १५ जण जखमी

मुंबई: घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या पी. ए. लोखंडे मार्गावर घडली. या घटनेत १५ जण जखमी असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महेश जगताप (३८) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेेल्या इसमाचे नाव असून तो येथील सहदीप कॉलनीतील जगताप चाळीत आई, पत्नी व २ मुलींसह राहत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यानंतर सर्वजण झोपले होते. मात्र घरातील गॅस सिलेंडर लिकेज असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसगळती होत होती. रात्रीच या कुटुंबीयांना गॅसचा वास येत होता. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रात्रभर हा गॅस संपूर्ण घरामध्ये पसरला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश यांची पत्नी जोत्स्ना जगताप (२५) या नेहमीप्रमाणे झोपेतून उठली. तिने लाईट लावण्यासाठी बटन चालू केले. याच दरम्यान घरात पसरलेल्या गॅसने पेट घेतला. आणि काही क्षणातच सिलेंडरचा देखील मोठा स्फोट झाला.
गॅसचा हा स्फोट एवढा भयानक होता, की त्यामुळे घरावर असलेला पोटमाळा खाली कोसळला. शिवाय आजूबाजूच्या तीन घरांच्या भिंती देखील झोपेत असलेल्या कुटुंबियांवर कोसळल्या. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी तत्काळ जगताप यांच्या घराकडे धाव घेतली. संपूर्ण घर पडल्याने काही रहिवाशांनी घरातमधील काहींना बाहेर काढले. तर काही मिनिटांतच ही माहिती पोलीस आणि अग्नीशामक दलाला मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढले. यामध्ये जगताप कुटुंबियांसह त्यांच्या पोटमाळ्यावर राहणारे चारजण आणि शेजारी असे एकूण १६ जण जखमी झाले. सर्वांना पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच महेशचा मृत्यू झाला असून त्यांच्या आईची आणि पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जगताप यांचे घरअतिशय लहान गल्लीमध्ये असल्याने मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. मात्र, अग्नीशामक दलाने रहिवाशांच्या मदतीने तत्काळ सर्व जखमींना बाहेर काढल्याने मोठी हानी टळल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. याबाबत टिळक नगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
जखमींची नावे: काजल काटे (१७)पौर्णिमा काटे(२०),राणी काटे (१८),उषा शहानी (३२),रवींद्र काटे(२५),मीना (४५), मयूर सकपाल(२०),नितीन काटे(२५),नितीन (२०),प्रियंका शिंदे (२३),देवानंद शिंदे(४७),सुरेश पाटील (५०)आणि शांताबाई जाधव (७५).

Web Title: The gas cylinder blast in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.