हरित तंत्रज्ञानाने केले कचरा व्यवस्थापन
By Admin | Updated: January 29, 2015 02:01 IST2015-01-29T02:01:07+5:302015-01-29T02:01:07+5:30
सीवूड येथील कोकण रेल्वेच्या कॉलनीमधील कचरा व्यवस्थापनासाठी कोकण रेल्वेने कॉलनीतच जैविक कचरा खत मशिनची स्थापना केली आहे

हरित तंत्रज्ञानाने केले कचरा व्यवस्थापन
नवी मुंबई : सीवूड येथील कोकण रेल्वेच्या कॉलनीमधील कचरा व्यवस्थापनासाठी कोकण रेल्वेने कॉलनीतच जैविक कचरा खत मशिनची स्थापना केली आहे. ही प्रणाली इकोफ्रेण्डली असून, यामध्ये टाकलेल्या कचऱ्याची अवघ्या १० दिवसांत खत निर्मिती शक्य झाली.
कचरा समस्येवर कोकण रेल्वे प्रशासनाने सेंद्रिय आणि हिरव्या कचऱ्याचे सक्षमरीत्या व्यवस्थापन करण्यासाठी जैविक कचरा खत मशिनचा वापर सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण
रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांच्या
हस्ते झाले.
सीवूड येथील कोकण रेल्वेच्या निवासी कॉलनीत मोठ्या प्रमाणात हिरवाई असल्याने या परिसरात दररोज २०० ते २५० किलो एवढ्या सेंद्रिय आणि हिरव्या कचऱ्याची निर्मिती होते. यातून जैविक कचरा खत मशिनच्या पर्यायाने कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती शक्य झाली.यातून निर्माण झालेले खत वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोगी ठरत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मोठा हातभार लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर येत्या काळात या मशिनचा उपयोग विविध रेल्वे मार्ग आणि मोठ्या रेल्वे स्टेशन आणि कोकण वसाहतीमध्ये ही प्रणाली राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)