गणपती बाप्पा मोरया, नियम पाळूया, कोरोना टाळूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:10 IST2021-09-10T04:10:53+5:302021-09-10T04:10:53+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे व्यापार-व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच आलेल्या ...

गणपती बाप्पा मोरया, नियम पाळूया, कोरोना टाळूया
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे व्यापार-व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच आलेल्या या सणांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यास सगळेच सज्ज आहेत. तो उत्साह मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांच्या मुख्य बाजारपेठांमध्ये गेले काही दिवस दिसतो आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे ६४०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर, सुमारे एक लाख २५ हजार घरांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. त्यासाठी दादर, लालबाग-परळ या भागात खरेदीची मोठी झुंबड गेले काही दिवस पाहायला मिळाली. दादरच्या फूल बाजारात तर पाय ठेवण्यासही जागा नव्हती.
घरोघरी गणरायाचे उत्साहाने स्वागत होत असतानाच कोरोनाचे संकट वाढू नये यासाठी सगळ्यांनीच आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन पालिका आणि पोलीस या दोघांकडूनही करण्यात आले आहे.