गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हस्तकास बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:08+5:302021-07-28T04:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हस्तक सादिक बंगाली याला कॉटनग्रीन परिसरातून मंगळवारी शस्त्रासह बेड्या ठोकण्यात ...

Gangster Ravi Pujari gang's handcuffs | गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हस्तकास बेड्या

गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हस्तकास बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हस्तक सादिक बंगाली याला कॉटनग्रीन परिसरातून मंगळवारी शस्त्रासह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

सादिक हा लोणावळा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध पुणे येथील पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे नोंद आहेत. तसेच मुंबई, नवी मुंबईत रवी पुजारीच्या सांगण्यावरून बॉलिवुड सेलिब्रिटी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे नोंद आहेत. तो पुणे येथील एका हत्येच्या गुह्यांत हवा असलेला आरोपी आहे.

सादिक हा रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीचा सक्रिय हस्तक असल्यामुळे त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. त्याच्याकडून १ देशी पिस्तूल, रिव्हॉलवर आणि १५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Gangster Ravi Pujari gang's handcuffs