अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: April 14, 2015 02:39 IST2015-04-14T02:39:24+5:302015-04-14T02:39:24+5:30

प्रियकरासोबत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री ११च्या सुमारास धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात घडला.

Gang rape on minor girl | अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

प्रियकरासह तिघांवर गुन्हा : धारावीच्या निसर्ग उद्यानातील प्रकार
मुंबई : प्रियकरासोबत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री ११च्या सुमारास धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात घडला. हे दोघे तरुणीच्या प्रियकराचे मित्र असावेत़ प्रियकरही या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय आहे.
पीेडित तरुणी दक्षिण मुंबईत फूटपाथवर राहते. रविवारी रात्री ती प्रियकर इम्तियाजसोबत वांद्रे पश्चिम येथील मस्तान तलावाकडे फिरण्यासाठी आली होती. तेथे तिला एकाकी सोडून इम्तियाज पसार झाला. ही संधी साधून त्या दोघांवर पाळत ठेवून असलेले दोन अनोळखी तरुण तक्रारदार तरुणीकडे आले. तुझा मित्र परत नाही येणाऱ आम्ही तुला सुरक्षितपणे घरी सोडतो, असे सांगून तरुणीला टॅक्सीत बसविले. मात्र त्यांनी टॅक्सी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ सोडली. तरुणीला तेथे उतरविले. तुटलेल्या भिंतीतून या तरुणीला उद्यानात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

असे आले उघडकीस़़़
रात्री साडेअकरा वाजता फाटक्या कपड्यांमध्ये व खरचटलेल्या अवस्थेत ही तरुणी रस्त्यावर आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिची अवस्था पाहून चौकशी केली, तेव्हा तिने घडला प्रकार सांगितला. तिला सायन रुग्णालयात नेले. तिच्या जबाबावरून पोलिसांनी प्रियकर इम्तियाजसह तिघांवर अपहरण, सामूहिक बलात्कार असे गुन्हे नोंदविले.

Web Title: Gang rape on minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.