लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डिलिव्हरीबॉयच्या मदतीने ग्राहकांच्या ऑर्डर्सची हेराफेरी करत ई-कॉमर्स कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. आरोपी महागड्या व स्वस्त वस्तूंच्या स्वतंत्र ऑर्डर्स देत व डिलिव्हरी बॉयच्या संगनमताने बारकोड स्टिकर्सची अदलाबदल करीत. स्वस्त वस्तूंचा बॉक्स महागड्या वस्तूच्या नावावर परत पाठवून परताव्याचे (रिफंडचे) पैसे उकळले जात होते.
गुन्हे शाखेच्या कक्ष ८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि रोहन बगाडे आणि अंमलदार पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे. चार जणांना अटक करून ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ६ ऑक्टोबर रोजी बोरीवली पश्चिम, चंदावरकर मार्गावरील रिलायन्स डिजिटल स्टोअरसमोर करण्यात आली.
मुंबई गुन्हे शाखेने सापळा रचून डिलिव्हरी टेम्पो आणि कारमधील डिलिव्हरीबॉय आणि अन्य तिघांना रंगेहाथ पकडले. आरोपी हरयाणा आणि छत्तीसगडचे रहिवासी आहे.
Web Summary : An interstate gang defrauding e-commerce firms by manipulating orders with delivery boy's help was busted. They swapped barcodes, returning cheap items as expensive ones for refunds. Four were arrested, and ₹45 lakh worth of goods were seized near Borivali.
Web Summary : डिलीवरी बॉय की मदद से ऑर्डर में हेराफेरी कर ई-कॉमर्स कंपनियों को धोखा देने वाले एक अंतरराज्यीय गिरोह का पर्दाफाश किया गया। वे बारकोड बदलते थे, सस्ते सामान को महंगे बताकर रिफंड लेते थे। बोरीवली के पास से चार गिरफ्तार, ₹45 लाख का माल जब्त।