गणोशोत्सवापूर्वी खड्डे बुजणार

By Admin | Updated: August 3, 2014 00:55 IST2014-08-03T00:55:14+5:302014-08-03T00:55:14+5:30

महापालिकेतर्फे गणोशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Before the Ganeshotsav, the pits would be scattered | गणोशोत्सवापूर्वी खड्डे बुजणार

गणोशोत्सवापूर्वी खड्डे बुजणार

मुंबई : महापालिकेतर्फे गणोशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. गणोशोत्सवात भक्तांना आणि सर्व मुंबईकरांना खड्डय़़ांचा त्रस होणार नाही, याकरिता पालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या श्री गणोशोत्सव माहिती पुस्तिका 2क्14 चे प्रकाशन सुनील प्रभू यांच्या हस्ते स्थापत्य समिती सभागृहात केले; या वेळी ते बोलत होते. मुंबईतील सर्व गणोशोत्सव मंडळांना नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून गणोशोत्सव आनंददायी वातावरणात आणि निर्विघ्नपणो पार पाडण्यासाठी सर्व गणोशोत्सव मंडळे तसेच गणोशभक्त आणि मुंबईकरांनीही महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
श्री गणोशोत्सव 2क्14 संदर्भात श्री गणोशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी, पालिका प्रशासन, पोलीस संबंधित अधिका:यांसमवेत चर्चा केली आहे, असेही महापौरांनी सांगितले (प्रतिनिधी)
 
पुस्तकात सर्वसमावेशक माहितीसार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पूरक माहिती, महापालिकेच्या गणोश गौरव स्पर्धा 2क्14 चा तपशील, मुंबईतील गणोशमूर्ती, विसर्जनाची ठिकाणो, त्यांचे मार्ग व नकाशे, गतवर्षीच्या गणोशमूर्ती विसर्जनाची सांख्यिकी माहिती तसेच मूर्ती विसर्जनाच्या प्रसंगी समुद्रातील भरती आणि ओहोटीच्या वेळा व लाटांची उंची या सर्वाचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. 

 

Web Title: Before the Ganeshotsav, the pits would be scattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.